husband wife 
मुंबई

चक्रावून टाकणारी घटना ! बायकोने बेडरूममध्ये बोलावलं, नवऱ्यानं ऐकलं नाही म्हणून तिनं काय केलंय वाचा...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत कधी काय घडेल कहीही सांगता येत नाही. लॉकडाउनच्या काळात बहुतांश पती-पत्नी घरीच एकमेकांसोबत वेळ घालवतायत. त्यामुळे बहुतांश पती-पत्नींमध्ये प्रचंड प्रेमाचं वातावरण पाहायला मिळतंय. मात्र मुंबईत एक अजब घटना घडली आहे. एका पत्नीनं बेडरूममध्ये झोपायला बोलवल्यानंतरही पती न गेल्यामुळे पत्नीनं धक्कादायक असं कृत्य केलंय. 

बोरिवली पश्चिमेच्या ओल्ड एमएचबी कॉलनीत राहणारे ए. ए. दळव ७ मे ला सायंकाळी ५ वाजता त्यांच्या फ्लॅटमधल्या लिव्हिंग रूममध्ये झोपले होते. त्यावेळी त्यांची पत्नी शायनाजनं त्यांच्यावर ओरडायला सुरुवात केली. तिनं दळवींना बेडरूममध्ये झोपायला सांगितलं. मात्र तिच्या बोलण्याकडे दळवींनी दुर्लक्ष केलं. मात्र तिच्या आरडाओरडीमुळे त्यांना शांत झोपही लागत नव्हती. मात्र तरीही त्यांनी तिचं ऐकलं नाही. मात्र यांनतर जे घडलं ते भीषण होतं. 

त्यानंतर शायनाज किचनमध्ये गेल्या आणि काही वेळानं उकळतं पाणी घेऊन बाहेर आल्या. त्यावेळी दळवी झोपले होते. त्यांच्या पत्नीनं दळवींना झोपलेलं पाहून उकळतं पाणी दळवींच्या अंगावर फेकलं. त्यामुळे दळवी प्रचंड भाजले गेलेत. त्यांना लगेच कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे काही दिवस उपचार घेतल्यावर त्यांना आता डिस्चार्ज मिळाला. 

यानंतर त्यांनी थेट पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या पत्नीच्या विरोधात तक्रार दाखल केली. "आमच्यात नेह्मीच भांडणं होत असतात. नेहमी भांडणाची सुरुवात माझी पत्नी करते. तसंच तिच्या भांडणाला वैतागून आमच्या मुलानंही काही वर्षांपूर्वी घर सोडलं", असं दळवी यांनी पोलिसांना सांगितलं.

त्यानुसार पोलिसांनी शायनाज विरोधात भादंवि कलम ३२४, ३३८ आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शायनाजला अद्याप अटक करण्यात आली नाहीये. 

wife throw hot water on husband as he said no to come to bedroom read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

कधी स्पॉटबॉयचं काम तर कधी अभिनेत्रींचे कपडे इस्त्री केले ; बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा डोळ्यात पाणी आणणारा स्ट्रगल

SCROLL FOR NEXT