मुंबई: अयोध्येेतील राम मंदिराच्या भुमी पूजनासाठी 5 ऑगस्टचा दिवस निश्चित झाला आहे.त्यामुळे राम मंदिर उभारणीसाठी आग्रही असलेले मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भुमिपूजनाचे निमंत्रण येईल का पासून निमंत्रण आल्यावर ते जातील का अशी चर्चा सुरु झाली आहे. यावर, 'राममंदिर हा आमच्यासाठी मानापमानाचा मुद्दा नसून आमचे नाते थेट प्रभु रामशी जोडलेले आहे'.अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली. राम मंदिरासाठी देणगी देणारी शिवसेना ही देशातील पहिला संघटना आहे.असेही त्यांनी नमुद केले.
रामजन्म भुमी मंदिरासाठी शिवसेना पहिल्या पासून आक्रमक होती.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे राम जन्मभुमीवर गेले होते.त्यामुळे आताही ते जातील का तसेच त्यांना निमंत्रण मिळेल का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.त्यावर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना भुमिका मांडली आहे.
निमंत्रण देण्याचे काम आयोजकांचे आहे.निमंत्रण आल्यास कोणी जावे हे मुख्यमंत्री ठाकरे ठरवतील.प्रभुरामचंद्र हा श्रध्देचा विषय असून त्याला राजकिय रंग दिला जाऊ नये.राम मंदिराच्या निर्मितीसाठीचा पाया रचणारी ही शिवसेना आहे. संतांचे सर्व आखाडे लढत होते. कायद्याची लढाई सुरू होती हेही मान्य आहे. यात श्रेय घेण्याचा विषय नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्याआधी आणि नंतरही अयोध्येला गेले होते.असेही त्यांनी नमुद केले.
----------------------------------------------------
Edited by Tushar Sonawane
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.