opposition-alliance-india Esakal
मुंबई

INDIA आघाडीत आणखी पक्ष सामील होणार? बैठकीसाठी आलेल्या प्रमुख नेत्यांचं सुतोवाच

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी २८ राजकीय पक्षांचे ६३ प्रतिनिधी मुंबईत दाखल झाले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : INDIA आघाडीत आणखी राजकीय पक्षांचा समावेश होणार असल्याचं सूतोवाच मुंबईत बैठकीसाठी आलेल्या आघाडीतील प्रमुख नेत्यांनी केलं आहे. इंडियाची तिसरी बैठक आज आणि उद्या मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीसाठी २८ राजकीय पक्षांचे ६३ प्रतिनिधी मुंबईत दाखल झाले आहेत. (Will more parties join INDIA alliance hints main leaders who came for meeting in Mumbai)

जयंत चौधरी काय म्हणतात?

राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी म्हणाले, "देशाला पुढे नेण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र काम करणार आहेत. इंडिया आघाडी वाढत जाणार असून येत्या काळात अनेक राजकीय पक्ष यामध्ये जोडले जाणार आहेत"

मुफ्तींनी काय म्हटलंय?

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यंमत्री आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी मुंबईत दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. 'जुडेगा भारत, जितेगा इंडिया' अशी घोषणाबाजी त्यांनी यावेळी केली.

आठवले, मायावतींवर टीका

समाजवादी पार्टीचे खासदार राम गोपाल यादव मुंबईतल्या इंडिया बैठकीसाठी आले आहेत. यावेळी त्यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यावर निशाणा साधला. "या दोन्ही नेत्यांचं आता देशाच्या राजकारणात महत्व राहिलेलं नाही" असं त्यांनी म्हटलं.

संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र

राजदचे नेते तेजस्वी यादव म्हणाले, "आम्ही जातीयवादी शक्तींविरोधात एकत्र आलो आहोत. ज्यांनी संविधानाला आणि लोकशाहीला धोका निर्माण केला आहे अशा शक्तींशी लढण्यासाठी आम्ही जमलो आहोत"

बैठकीत काय होणार चर्चा?

मुंबईत होत असलेल्या इंडियाच्या तिसऱ्या बैठकीसाठी सध्या २८ पक्षांचे ६३ प्रतिनिधी मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीत दोन पक्षांची वाढ झाली आहे. यावेळी इंडियाचा लोगो आणि सर्व पक्षांमध्ये समन्वय कसा साधायचा?

तसेच या इंडिया आघाडीचा कोणी समन्वयक असावा का? तसेच २०२४ साठी किमान समान कार्यक्रम काय असेल? यावर या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Vidhan Sabha: ''शिवसेनावाल्यांची माफी मागतो.. त्याशिवाय विशाल पाटील खासदार होऊच शकले नसते'', बाळासाहेब थोरातांचा सांगलीत खुलासा

Share Market Today: शेअर बाजारात काय होणार? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

IND vs AUS : विराट कोहलीचा डिफेन्स, जसप्रीचा बाऊन्सर अन् टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियाला चॅलेंज, Video

Latest Maharashtra News Updates : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

'महाराष्‍ट्र लुटून गुजरातचा विकास करणाऱ्या बाप-लेकांना सिंधुदुर्गात थारा देऊ नका'; उद्धव ठाकरेंचा राणे घराण्यावर हल्ला

SCROLL FOR NEXT