मुंबई

मुंबईकरांच्या मनात ट्रेनची दहशत? लॉकडाऊन नंतर मुंबईकर लोकलने प्रवास करणार का ? मुंबईकर म्हणतायत

सकाळवृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव मुंबईत सर्वाधिक आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा सोडून अन्य व्यवहार ठप्प आहेत. मुंबई शहर हे रेड झोनमध्ये आहे. सर्व वाहतूक सेवेही बंद आहे. लोकल रेल्वे सेवा ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. ही लोकल सेवाही बंद आहे. त्यातच मुंबईची लाईफलाईन कधी रुळावर येईल? प्रत्येकजण प्रश्न विचारत असल्याचं दिसून आलं आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेकांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास नकार दिला आहे. मात्र आता जवळपास 61 टक्के प्रवाशांनी पुढील दोन ते तीन महिने लोकलमधून प्रवास करण्याची भीती व्यक्त केली आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणासाठी 50,954 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. 

सर्वात लोकप्रिय लोकल सेवेचं अ‍ॅपन एम-इंडिकेटरनं या संदर्भातलं सर्वेक्षण केलं आहे. त्यानंतर समोर आलेले निकाल आश्चर्यचकित करणारा आहे. लॉकडाऊन हटवल्यानंतर लोकांना मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करायचा आहे की नाही हे समजण्यासाठी 27 मे रोजी 50 हजारपेक्षा जास्त प्रवाशांचे सार्वजनिक सर्वेक्षण करण्यात आले. कमीतकमी 61 टक्के लोकांनी म्हटलं की, पुढील दोन ते तीन महिन्यांपर्यंत लोकलनं प्रवास करणार नाही, जरी गाड्या पुन्हा सुरू झाल्या तरी प्रवाशांनी लोकलनं प्रवास करण्यास नकार दिला असल्याचं M-Indicator अ‍ॅपचे संस्थापक सचिन टेके यांनी सांगितले.

प्रवाशांच्या मानसिकतेचा अभ्यास 

प्रवाशांपैकी फक्त 39 टक्के लोकांनी तातडीने प्रवास करण्याची तयारी दर्शविली. या सर्वेक्षणातून सद्यपरिस्थितीत येणार्‍या जनतेची मानसिकता समजून घेण्यास मदत करत असल्याच टेके यांनी म्हटलं आहे. एम-इंडिकेटर अॅप टेके यांनी लाँच केले. टेके यांनी व्हीजेटीआयमधून इंजिनिअरिंग केलं आहे. मे 2010 मध्ये 'मोब' आणि 'बॉन्ड' च्या संयोजनात मोबोंड या ब्रँड नावाखाली 'गर्दीला रोखणं' किंवा 'संतप्त जमावाला थांबवणं' हे त्या अॅपचं मुख्य उद्दिष्टं आहे.

टेके हे स्वतः एक संघर्ष करणारा प्रवासी आहे. ट्रेन किंवा कोणत्याही एक्स्प्रेस ट्रेनचं वेळापत्रक किंवा त्यांचा येण्याचा अपेक्षित वेळ जाणून घेण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी हे अॅप विकसित केलं. 2006 मध्ये ग्रॅज्युशनंतर त्यांनी एका सॉफ्टवेअर कंपनीत काम केले आणि मोबाईलचे अ‍ॅप्लिकेशन्स विकसित केले. यावेळी त्यांनी नेरुळहून सीप्झ, अंधेरी पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीचा वापर करुन प्रवास केला. या प्रवासाच्या निराशेचा आणि अनुभवाचा परिणाम म्हणजे एम-इंडिकेटर.

प्रवास करण्याच्या पर्याय बदलणार 

एनर्जी रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (TERI) च्या नुकत्याच झालेल्या एका पेपरमध्येही अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केली गेली. सध्या सुरू असलेल्या कोविड-19 च्या संकटामुळे येत्या काळात शहरी वाहतुकीच्या वापरात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक आणि सामायिक वाहतुकी दरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या पर्याय असतानाही गर्दी असलेल्या ठिकाणांशी संबंध येणार असल्यानं प्रवासामुळे होणारी वाढीव जोखीम पाहता प्रवास करण्याच्या निवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

TERI कडून सांगण्यात म्हटलं की, आम्ही केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं की कोविड-19 लॉकडाऊननंतर कामासाठी प्रवास करताना वाहतुकीच्या पर्यायात बदल करणार असल्याचं 35 टक्के लोकांनी नमूद केलं. बस आणि मेट्रो सेवांच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात घट नोंदली गेली आहे. यामुळे टॅक्सी आणि ऑटो रिक्षा अशा खाजगी वाहने आणि इंटरमीडिएट पब्लिक ट्रान्सपोर्ट (आयपीटी) च्या वापराकडे प्रवासी वळणं हे अपेक्षित आहे. सर्वात मोठी घट मेट्रो सेवांच्या (साधारणत: 9 टक्के) त्यानंतर बसेस (4 टक्के) आणि लोकल गाड्यांमध्ये (1 टक्के) झाली आहे.

will mumbaikar travel by mumbai local post corona see what report says

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT