Rutuja latke 
मुंबई

Andheri ByElection: ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत भेदभाव का? हायकोर्टाचा BMCला सवाल

मुंबई महापालिकेत अडकलेल्या लटके यांच्या राजीनाम्यावर सध्या हायकोर्टात सुनावणी सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवंगत शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर सध्या हायकोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. लटके यांच्यावतीनं अॅड. विश्वजीत सावंत हे युक्तीवाद करत आहेत. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत लिपिक म्हणून काम करतात, आपल्या पदाचा राजीनामा दिला तरच त्यांना निवडणूक लढवता येणार आहे. पण राजीनामा देऊनही तो अद्याप मंजूर झाला नसल्यानं यासंदर्भात मुंबई हायकोर्ट सुनावणी सुरु आहे. यापार्श्वभूमीवर हायकोर्ट काय निर्णय देतंय याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. (Will Rituja Latke candidature be cleared for Andheri ByElection Hearing started in Mumbai High Court)

लटके यांनी कोर्टाला सांगितलं की, ३ ऑक्टोबरला मी राजीनामा दिला. तेव्हा मला ठराविक रक्कम पालिकेनं भरायला सांगितली. त्यानुसार मी ६७ हजार रुपये पालिकेकडं जमा केले. तसेच रितसर सर्व प्रक्रिया मी पूर्ण केली आहे. राजीनाम्यासाठी जी कागदपत्रे आहेत ती सुद्धा जोडली आहेत. काल त्यांनी आयुक्तांची भेट घेतली तेव्हा सुद्धा त्यांना याची सर्व प्रक्रिया सुरु असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण मी निवडणूक लढवत असल्यानं राजकीय दबावापोटी माझा राजीनामा मंजूर केला जात नाहीए, असा आरोपही लटके यांनी केला आहे.

दरम्यान, या युक्तीवादादरम्यान याचिकाकर्त्यांकडून हेमांगी वरळीकर यांच्या राजीनाम्याचा दाखला देण्यात आला. सन २०१२ रोजी वरळीकर यांना मुंबई महापालिकेची उपमहापौरपदाची निवडणूक लढवायची होती. त्यावेळी त्या पालिकेत पाणी पुरवठा विभागात कार्यरत होत्या. त्यामुळं त्यांना या पदाचा राजीनामा सोपवला होता. त्यावेळी एक महिन्याच्या आत हा राजीनामा स्विकारण्यात आला होता. या युक्तीवादानंतर लटकेंच्या राजीनाम्याबाबत भेदभाव का? असा सवालही हायकोर्टानं मुंबई महापालिकेला केला आहे.

उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख

उद्या, १४ ऑक्टोबर ही पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळं तातडीनं या प्रकरणावर सुनावणी करावी अशी विनंती ऋतुजा लटके यांनी हायकोर्टाकडं केली आहे. यावेळी पालिकेकडून अॅड. अनिल साखरे बाजू मांडत आहेत. लटके यांनी कोर्टात सांगितलं की, २ सप्टेंबरलाच मी सशर्त राजीनामा दिला होता. पण त्यामध्ये तांत्रिक चुका काढण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा एक राजीनामा देण्यात आला, पण आता तो वेळेच्या बंधनाचं कारण सांगत पुन्हा अर्ज लटकवून ठेवण्यात आला आहे.

राजीनामा मंजूर करणार आहोत की नाही? - हायकोर्ट

हायकोर्टानं पालिकेला विचारलं की, जर तुमचा क्लास थ्रीचा कर्मचारी निवडणूक लढवू इच्छित आहे, तर तुम्ही त्याचा राजीनामा का मंजूर करत नाही आहात. यावर पालिकेच्या वकिलांनी सांगितलं की, या अर्जात तांत्रिक अडचणी आहेत. यानंतर हायकोर्टानं सांगितलं की, अडीच वाजता मुंबई महापालिकेनं सांगावं की ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करणार की नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT