मुंबई

Sachin Vaze: 100 कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझेला मिळणार जामीन? महत्वाची माहिती आली समोर!

Latest Marathi News | भारती डांगरे यांचे खंडपीठ २३ ऑगस्टला राखून ठेवलेला निकाल जाहीर करणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Crime News: शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून न्या. भारती डांगरे यांचे खंडपीठ २३ ऑगस्टला राखून ठेवलेला निकाल जाहीर करणार आहे.

सचिन वाझे याच्याविरोधात १०० कोटी वसुली प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली होती; मात्र ईडीने याला विरोध दर्शविला होता. वाझे याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी ज्येष्ठ वकील आबाद पोंडा व ॲड. रोनक नाईक यांच्यामार्फत अर्ज दाखल केला.

या अर्जावर न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी ॲड. पोंडा यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, वाझे दोन वर्षांपासून तुरुंगात असून अद्याप खटल्याला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे. सरकारने मात्र त्याच्या अर्जाला विरोध केला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला. न्यायालय हा निकाल २३ ऑगस्टला जाहीर करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT