Mumbai News esakal
मुंबई

Mumbai News : समुद्राची मच्छी बंद झाल्याने खाडीच्या मच्छीला खव्याची पसंती

चिवणी माशांना मागणी वाढली बाजारात 500 रुपये वाट्याला 8 ते 10 चिवणी

संदीप पंडित

विरार : जूनच्या १ तारखेपासून समुद्रातील मच्छी बंद झाली असल्याने मच्छी खवय्यांचे हाल होत असतानाच :पावसाची सुरुवात होताच खाडीकिनारी येणाऱ्या काटेरी चिवणी माशांची आवक सध्या वसईच्या मासळी बाजारात वाढली आहे. चिवणी मासा हा खाडी, नदी, नाले तसेच तलावांच्या मुखाशी सहज आढळतो. हा मासा खायला अत्यंत चविष्ट असल्याने पावसाळ्यात या माशाला भलतीच मागणी वाढते. मात्र यंदा हा मासा खाडीप्रदुषण, औद्योगिक कारखान्यांतील सांडपाण्यामुळे काहीसा कमी प्रमाणात मिळत असल्याने या माशाच्या विक्री दरात कमालीची वाढ झाली आहे. 200,ते 500 रुपये वाटा चिवणी मासे विकले जात आहेत . मात्र वसईतील पट्टीचे खवय्ये तरीदेखील हा मासा खरेदी करण्यासाठी खिसा सैल सोडत असल्याचे चित्र दिसून येते.पावसाळ्यात जशी शाकाहारामध्ये शेवाळी,कोरल,सुरणाचे फुल तसेच रानभाज्यांना मागणी असते तशीच मागणी पावसाळा सुरु झाल्यावर या माशांना मिळत आहे.

चिवणी ही काटेरी मासळी खायला अतिशय चविष्ट असते. या माशांच्या अंड्यांनादेखील मोठी मागणी असते. तव्यावर तळून किंवा कालवण करून हे मासे खाल्ले जातात. सध्या आवक कमी असल्याने 200 ते 500 रुपयांना 8 ते 10 लहान, मोठे मासे विकले जात आहेत. आवक वाढल्यानंतर हे मासे स्वस्त होतील, असे मासेविक्रेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, पावसाच्या सुरूवातीला खाडीच्या मुखाच्या भागात चिवणी मासळीचे साठे मोठ्या प्रमाणात असतात. सध्या खाडीकिनारे प्रदूषित झाल्याने मासळीचे प्रमाण घटलेले आहे. त्याचा फटका चिवणी माशाला बसत आहे. खाडी व्यतिरीक्त शेतात, तलावात, नदीत हे मासे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पावसात खाडीकिनाऱ्यावर शिंगाली माशांसारखे दिसणारे, मात्र त्यापेक्षा आकारने लहान असणारे तीन काट्यांचे म्हणजेच चिवणी हे मासे सहज मिळतात.

हा मासा चिकट असल्यामुळे तो हातात धरताच सटकतो. त्याचा काटा टोचल्यास इजा होते. खाडीकिनारी हे मासे पहिल्याच पावसात अंडी घालतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला हजारोंच्या संख्येने हे मासे किनाऱ्यावर येतात. त्यामुळे मोठ्या पावसाची वाट येथील स्थानिक मासेमार तसेच खवय्येही पाहत असतात . दरम्यान, पावसाच्या सुरूवातीला वसईतील खाडी, तलावे व नदीत या माशांची मासेमारी मोठ्या प्रमाणात वाढली असून मासेमारांनादेखील मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त झाला आहे. तर पट्टीचे खवय्ये चिवणी माशांसहित या माशांची अंडी (गाबुली) मिळवण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

Ashok Chavhan : ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला.....अशोक चव्हाण यांची बाळासाहेब थोरात आणि देशमुखांवर खोचक टीका

Sangamner Result: संगमनेरमध्ये पराभवाचा बदला पराभवानेच! ४० वर्षांची कारकीर्द ४१ वर्षांच्या तरुणाने संपवली; नेमकं काय घडलं?

Zimbabwe beat Pakistan: यांना झिम्बाब्वेने हरवले... पाकिस्तानचे ६ फलंदाज ६० धावांत तंबूत, मोहम्मद रिझवाच्या संघाची गेली लाज

SCROLL FOR NEXT