मुंबई : मुंबई ट्राफिक पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ट्राफिक पोलिस घोषणा न करताच अवैधरित्या पार्किंग केलेले वाहने उचलून नेत असल्याचा आरोप एका तरूणाने केला आहे. तर एका महिलेची गाडी पोलिसांनी जबरदस्तीने उचलून नेली असल्याचा आरोपही यामध्ये करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये ट्राफिक पोलिसांची गाडी रस्त्यावर अवैधरित्या पार्किंग केलेले वाहने उचलून नेत आहे. त्यामध्ये अवैधरित्या पार्किंग केलेल्या वाहनांच्या जवळ जाऊन कोणतीही घोषणा न करता किंवा गाडीच्या नंबरची घोषणा न करता गाड्या उचलून नेण्यात येत आहेत. एक महिलासुद्धा या व्हिडिओमध्ये आरोप करताना दिसत आहे.
"माझी गाडी पाठीमागे ओढत पोलिस घेऊन गेले" असा आरोप या महिलेने केला आहे. तर उचलून नेलेल्या गाडीमध्ये महिलेची पर्स आणि बॅग असल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या कळात कोणतीही घोषणा न करता गाड्या उचलून नेत असल्याचा आरोप या व्हिडिओमध्ये नागरिकांकडून करण्यात आला आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.