कासा : केंद्रातील मोदी सरकारने (central government) उज्ज्वला योजनेतून १०० रुपयांत गॅस सिलिंडर (Gas cylinder) देऊन चुलीमधून निघणाऱ्या धुरापासून गोरगरीब महिलांची सुटका केली खरी; पण आता सिलिंडरचे दर वाढल्याने सरकारने (Maharashtra Government) २०२१-२२ ला ६९४ ते ९६० रुपयांत सिलिंडर देऊन आधीची कसर भरून काढली आहे. त्यात रोजंदारी करून सिलिंडर घेणे आता परवडत नाही. त्यामुळे चुलीवरचा धूर (chulha) परवडला; पण गॅसची टाकी विकत घेणे नको, असे ग्रामीण भागातील मजुरी करणाऱ्या (women's agony) महिला म्हणू लागल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील ९५ टक्के कुटुंबे जंगलातून जळाऊ लाकूड-फाटा आणून चुलीवरचे स्वयंपाक करत होती; परंतु उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकारने १०० रुपयांत सबसिडीवर गॅस उपलब्ध करून दिला. सुरुवातीला हा सिलिंडर घ्यायला परवडत होता. मोफत सिलिंडर मिळाला म्हणून नागरिकही आनंदी होते. लाकूड फाटा आणण्याचा ताण कमी झाला होता; परंतु कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णत: विस्कळित झाली. एकीकडे आर्थिक अडचणी असताना दुसरीकडे महागाईचा भस्मासूर वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांवरही आर्थिक ताण आला आहे. सिलिंडरची किंमत एवढी वाढली की, सध्या रोजंदारीवर जाऊन सिलिंडर घेणे महाग पडू लागले. त्यामुळे पुन्हा चूल पेटवून स्वयंपाक करणे अधिक परवडणारे असल्याने ग्रामीण भागात पुन्हा चूल पेटू लागल्या.
सबसिडी बंदच!
१) घरगुती सिलिंडरचे दर महिन्याला वाढत असून यामुळे सर्वांचेच आर्थिक ‘बजेट’ कोलमडत आहे. सुरुवातीला सिलिंडरवर सबसिडी मिळायची. दरवाढ झाल्यानंतर आता सबसिडी मिळत नाही, अशी ओरड महिला करीत आहेत.
२) इंधन दरवाढीमुळे आर्थिक गणित पूर्णत: विस्कळित होत आहे. यामुळे सिलिंडरचे दर कमी व्हावेत, अशी मागणी ग्रामीण भागातील महिलांकडून होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याचा सूरही आवळला जात आहे.
दर डबल, टाक्या अडगळीत
केंद्र सरकारने गाजावाजा करीत उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडरचे वितरण केले, मात्र काही महिन्यांत सिलिंडरचे दर गगनाला भिडल्याने, तसेच सबसिडीही जवळपास बंदच झाल्याने उज्ज्वला योजनेचे लाभार्थी व इतर गॅसधारक स्वयंपाकासाठी पुन्हा चुलीकडे वळले आहेत. गेल्या सात वर्षांत ४१० रुपयांवरून घरगुती सिलिंडरचे दर ९६० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यात ग्रामीण भागात तर सिलिंडर घरपोच करण्यासाठी १००० रुपये लागत असल्याने सिलिंडरच्या टाक्या अडगळीत फेकल्या आहेत.
रोजंदारी करून सिलिंडर घेणे आम्हाला परवडत नाही. त्यापेक्षा फुकटात मिळालेले सरपण आणून चूल पेटवणे सोपे आहे. त्यासाठी पैसे लागत नाहीत. धुराचा त्रास सहन करावा लागला तरी चालेल.
- सुनीता गायकर, गृहिणी, वाघाडी (कासा).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.