work of coastal road project will delayed six months cost of project is also increase mumbai sakal
मुंबई

Coastal Road Project : कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सहा महिन्यांनी लांबणार

वाढीव वेळेमुळे प्रकल्पाच्या खर्चातही वाढ अपेक्षित

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून कोस्टल रोडच्या प्रकल्पाअंतर्गत नुकतेच काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मच्छीमारांच्या बोटींसाठीच्या मागणीनंतर दोन खांबांमधील अंतर १२० मीटर करण्यात आले.

परंतु या कामामुळे प्रकल्पाच्या कालावधीत वाढ होणार आहे. तर दुसरीकडे प्रकल्पाचा खर्चही वाढणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत अतिरिक्त अभियांत्रिकी कामाचा समावेश होणार असल्याने प्रकल्पाचा वेळ वाढतानाच खर्चही वाढणार आहे.

या बदलामुळे प्रकल्प आणखी सहा महिन्यांनी पुढे जाण्याची शक्यता आहे. तसेच प्रकल्पाअंतर्गत नवीन तंत्रत्रानाच्या वापरामुळे हा खर्चही वाढणार आहे. कोस्टल रोडच्या प्रकल्पाअंतर्गत याआधी प्रत्येक ६० मीटरच्या अंतरावर भर समुद्रात खांब टाकण्यात येणार होते. परंतु मच्छीमारांच्या मागणीमुळे आता १२० मीटरच्या अंतरावर खांब टाकले जातील.

आधीच्या पद्धतीनुसार ३.५ मीटर व्यासाचा मोनोपायलिंग केले जाणे अपेक्षित होते. परंतु १२० मीटर अंतरासाठी आणखी दोन अतिरिक्त खांबांची भर नव्याने प्रकल्पात पडली आहे. १२० मीटर इतके अंतर दोन्ही पोलमध्ये ठेवताना आणखी दोन पोल याठिकाणी लागतील. त्यामुळे मोनोपायलिंगला पर्यायी तंत्रज्ञानाचा वापर प्रकल्पाअंतर्गत करावा लागणार आहे.

तसेच या १२० मीटरच्या अंतरासाठी विशिष्ट मटेरिअलचा वापरही या टप्प्यातील अंतरासाठी करावा लागेल. त्यानंतरच ब्रीज सक्षम होताना समुद्रात इतके अंतर कायम राखले जाणे प्रकल्पासाठी शक्य होईल.

कोणत्या तंत्रज्ञानाने ब्रीज निर्मिती ?

दोन ब्रीजमध्ये १२० मीटरचे अंतर राखण्यासाठी केबल स्टेड, स्टील आर्क किंवा एक्स्ट्राडोज ब्रीज या तीन पद्धतीच्या ब्रीजचा विचार प्रकल्पाच्या निमित्ताने केला जात आहे. महत्वाचे म्हणजे या तिन्ही तंत्रज्ञानामध्ये कमी खर्चातील तंत्रज्ञान या ब्रीज निर्मितीसाठी करण्यात येईल अशी माहिती आहे.मुंबई महानगरपालिकेने सल्लागाराला आणि कंत्राटदाराकडे कमी खर्च लागणाऱ्या तंत्रज्ञानाची विचारणा केली आहे.

सल्लागाराकडून या बाबीवर अद्याप कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाची घोषणा लवकरच अपेक्षित आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या समावेशामुळे प्रकल्पाच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे.

सल्लागाराला कोट्यावधीची फी

कोवी या युकेतील सल्लागार कंपनीकडून कोस्टल रोडच्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराने संपर्क साधला आहे. अशा मोठ्या अंतराचे ब्रीज निर्मिती करण्यासाठी अभियांत्रिकी सल्ला देण्यासाठीचा या कंपनीचा अनुभव आहे. कंपनीकडे असलेल्या कामांची रीघ पाहता मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडचा नंबर कधी लागणार हादेखील एक प्रश्नच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT