वडाळा : लॉकडाउन कालावधीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना लोकल रेल्वेने लवकरच प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेक्रेटरी आर. पी. पैबीर यांना याबाबत दूरध्वनीद्वारे कळविले आहे. तसेच दोन दिवसात रेल्वे कडून लेखी परवानगी देण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे स्थानकांना मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांनी ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी असे कळविले आहे. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार आता लोकल रेल्वेने प्रवास करू लागले आहेत. याची सर्व गोदी कामगारांनी नोंद घ्यावी असे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
गोदी कामगारांना मुंबईमध्ये लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी मिळणेबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया, केंद्रीय गृहसचिव भल्ला, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरशी पारेख, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्था. लो. समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मारुती विश्वासराव आदींनी प्रयत्न केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.