World Blood Donor Day sakal
मुंबई

मुंबई : महिलांमध्ये निरोगी रक्तदान होणे गरजेचे

स्त्रियांच्या पोषणामध्ये विशेषत: मातांना पौष्टिक आहार मिळणे आवश्यक आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रक्तदान करण्यात पुरुषांच्या तुलनेत कायमच स्त्रियांचे  प्रमाण अत्यल्प नोंदले गेले आहे. त्यासाठी अनेक कारणे जबाबदार आहेत. पण, आता महिलांमध्ये निरोगी रक्तदान होण्याची मागणी वाढू लागली आहे. नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिलनुसार, १८ ते ६५ वयोगटातील महिला दर चार महिन्यांनी रक्तदान करू शकतात. निरोगी खाल्ल्याने निरोगी रक्त निर्माण होण्यास मदत होते आणि सर्व अवयव उत्तम ठेवण्यास मदत होते. एका अहवालानुसार सर्व वयोगटातील ६३% महिलांना अॅनिमिया आणि १५ वर्षांखालील ४६% मुलींना अॅनिमिया आहे. यातून खाण्याच्या सवयी आणि चांगले पोषण निरोगी रक्तदान करण्यावर परिणाम करू शकतात.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ३ नुसार ५५% पेक्षा जास्त स्त्रिया १५ ते ४९ वर्षे वयोगटातील अशक्त आहेत. तर, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ४ नुसार, भारतातील गर्भ धारण वयातील एक चतुर्थांश महिला कुपोषित आहेत, त्यांचा बॉडी मास इंडेक्स १८.५ किलोग्रॅम पेक्षा कमी आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ (२०१९-२०२१) नुसार, ६ ते ५९ महिने वयोगटातील मुलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण सुमारे ६७% आहे जे किशोरवयीन मुलींमध्ये ५९% आहे, १५-१९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये ३१% आहे. गर्भवती नसणाऱ्या महिलांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण ५७% आहे.

पोषण, सूक्ष्म पोषक घटकांच्या सेवनाबाबत जागरूकता आणि रक्तदानावरील गैरसमज कमी करून रक्तदान वाढीमध्ये मोठा बदल होऊ शकतो. स्त्रियांच्या पोषणामध्ये विशेषत: मातांना पौष्टिक आहार मिळणे आवश्यक आहे. तरुण मातांना अतिसूक्ष्म पोषक तत्वांसह अन्नपदार्थांबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे, विशेषत: जे शारीरिक मेहनतीचे काम करतात. शारीरिक मेहनतीचे काम करणाऱ्या महिलांसाठी एकात्मिक बाल आणि माता विकास योजना राबवण्यात यावी ज्यामध्ये रक्तदानाबाबत सामान्य जागरूकता निर्माण होईल. प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये अ, ब, ड, ई सारख्या सूक्ष्म पोषक घटकांसह आहारातील पूरक आहाराचा समावेश करणे आणि त्यांच्याभोवती जागरूकता निर्माण करणे महत्वाचे ठरेल. तरच, महिलांमध्ये रक्तदानाचे प्रमाण वाढेल असे ग्लोबल रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसीन विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डाॅ. मंजूषा अगरवाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT