मुंबई : ऑगस्टच्या जागतिक वडा पाव दिनानिमित्त (world vada pav day) गेली दीड वर्ष सर्वजण कोरोनाची लढाई (corona fight) लढत असून शरीरातील रोग प्रतिकार शक्तीला (immunity) महत्व आले आहे. मात्र, शरीरातील रोग प्रतिकार शक्ती कायम ठेवायची असल्यास घरीच बनवलेले वडे (home prepared vade) खाण्याचा सल्ला जागतिक वडा पाव दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातून (doctors) दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी फूड सेफ्टी अँड स्टॅडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने तीन वेळा पेक्षा जास्त तेलाचा वापर तळण्यासाठी करू नये असे आदेश जारी केले असून ही त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले.
यावर बोलताना गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट तज्ञ डॉ. अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले कि, भविष्यात कोरोना लाटेचा धोका लक्षात घेता आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे महत्वाचे आहे, कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण मुंबईतच आढळले होते. याची कारणे अनेक असू शकतात, मात्र रोग प्रतिकारशक्ती हा एक महत्वाचा घटक विसरून चालणार नाही. आहार व विहार या दोन्ही बाबत मुंबईकर आजही सजग दिसत नाहीत. भूक लागल्यावर 80 टक्के मुंबईकर वडापाव अथवा भजी, पाणीपुरी समोसा व इतर तळलेले पदार्थ खातात व यातील 50 टक्के मुंबईकर रस्त्यावर मिळणारे पदार्थ खातात हे एका सर्वेक्षणानुसार सिद्ध झाले आहे.
या फेरीवाल्यांच्या आणि दुकानांमध्ये मिळणाऱ्या पदार्थांमध्ये भजी, सामोसे, वडे सारखे पदार्थ सकाळी एकदा काढईत टाकले जातात. त्याच तेलात दिवसभर उकळले जातात. शिल्लक तेल परत दुसऱ्या दिवशी वापरलं जातं. यामुळे त्या तेलाचे विघटन होऊन सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड तयार होतं. तेलाचा पुन्हा पुन्हा वापर केल्याने हृदयविकार, ब्लडप्रेशर, यकृताचे आजार, कॅन्सर, अपचन यासारखे दुर्धर आजार हाेत आहेत. अशा पदार्थांचा उष्मांकदेखील वजनवाढीस कारणीभूत ठरतात.
250 ते 500 कॅलरी असलेली ही खाद्यं हृदयासाठी जास्त धोकादायक असल्याचा इशारा डॉ. पाटील यांनी दिला आहे. तसेच मुंबईतील सुमारे 30 ते 40 टक्के नागरिक हे पोटाच्या विकारांनी त्रस्त असल्यामुळे या नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असल्याचे निरीक्षण मांडले. शिवाय अपुरी झोप, कायम पोटामध्ये मळमळ असणे, उत्साहाचा अभाव अशी लक्षणे आढळून येतात त्यामुळे बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे असा सल्ला त्यांनी दिला आहे.
तर,उदरविकार तज्ञ व शल्यविशारद डॉ. नितीन तवटे यांनी सांगितले कि, कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अनेक नागरिकांनी भीतीने आयुर्वेदिक अथवा घरगुती काढ्याचे सेवन केले होते. त्यामुळे, अनेकांना पोटाचे व मूळव्याधीचे आजार झाले होते आता दुसऱ्या लाटेनंतर सेल्फ मेडिकेशनमध्ये वाढ झाली आहे. बऱ्याच वेळा निदान न झाल्याने पोटाचे आजार बळावतात आणि मग मोठमोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. संतुलित आणि प्रोटिनयुक्त आहार व पुरेशी झोप घेऊन प्रतिकारशक्ती वाढवता येते. खाद्य विक्रेत्यांच्या स्वच्छतेबाबत, तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याबाबत आणि पदार्थांच्या शुद्धतेबाबत सरकारने पुढाकार घेण्याचे डॉ. तवटे यांनी सुचवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.