मुंबई : गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या बीडीडी चाळ (BDD Chaul redevelopment) पुनर्विकासातील महत्त्वाच्या टप्प्याचे काम आता सुरू होणार आहे. ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या बीडीडी प्रकल्पातील (bdd project) नायगावमधील ‘५ बी’ चाळीवर मंगळवारपासून (ता. ४) हातोडा चालवण्यात (Demolish) येणार आहे. नायगावपाठोपाठ ना. म. जोशी मार्ग आणि वरळी बीडीडी चाळीतील इमारती जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. ( worli BDD chaul demolishing starts from tomorrow)
राज्य सरकारने बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी म्हाडाकडे सोपवली आहे. त्यानुसार म्हाडाने वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगावमधील प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. वरळीमध्ये प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी म्हाडाने सदनिका क्रमांक निश्चितीची सोडत काढली आहे. त्यानुसार सोडतीमध्ये मिळालेल्या घराप्रमाणे रहिवाशांशी करार करण्याचे काम सुरू आहे. (Worli BDD Chawl Demolishing News Updates)
नायगाव बीडीडी चाळीतील दोन चाळी केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनेक वर्षांपासून रुग्णालयाचे कर्मचारी राहत होते. पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारतींचे काम करण्यासाठी दोन चाळी रिकाम्या करण्यात आल्या आहेत. त्यामधील १७५ कुटुंबियांना बॉम्बे डाईंगमधील इमारतींमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात २३ चाळी पाडण्यात येणार आहेत. नागरिकांच्या पुनर्वसनासाठी २२ मजल्यांचे टॉवर उभारण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात १९ चाळी तोडण्यात येतील. तेथे विक्री घटकासाठी ६० मजल्यांचे टॉवर उभारण्यात येणार आहेत. मंगळवारी (ता. ४) दुपारी २ वाजता ५ बी चाळ तोडण्यास सुरुवात होणार आहे.
चाळींच्या प्रत्येक दगडाला इतिहास
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासामुळे मुंबईच्या इतिहासातील नव्या टप्प्याला सुरुवात होत आहे, असे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर म्हटले आहेत. मंगळवारी (ता. ४) दुपारी २ वाजता आव्हाड प्रत्यक्ष चाळीला भेट देणार आहेत. चाळीच्या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात होणार आहे. चाळींच्या प्रत्येक दगडाला इतिहास आहे, असे सांगून डॉ. आव्हाड म्हणाले, की बीडीडी चाळ सांस्कृतिक चळवळीची साक्ष देणारी आहे. १०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतींचा पुनर्विकास व्हावा हे गेली २५ वर्षे पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.