nair hospital sakal media
मुंबई

मुंबई : नायर रुग्णालयातील हलगर्जीपणाची चौकशी!

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून दखल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वरळीतील बीडीडी चाळ (Worli bdd chaul) येथील घरातील सिलिंडर स्फोटात (gas cylinder explosion) चार जण गंभीर जखमी झाल्याची (four people injured) घटना मंगळवारी (ता. ३०) घडली होती, परंतु या घटनेत भाजलेल्यांवर नायर रुग्णालयात (Nair hospital) वेळेवर उपचार सुरू न केल्याचा आरोप (hospital authorities irresponsibility) नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. रुग्णालयातील अपघात विभागात उपस्थित डॉक्टर आणि परिचारिका त्यांच्यावर उपचार देण्याऐवजी तसेच खुर्चीवर बसून राहिल्याचा व्हिडीओ व्हायरल (Video viral) झाल्यानंतर धास्तावलेल्या नायर रुग्णालयाने या दोघांवरही चौकशीचे आदेश (investigation order) दिले आहेत.

वरळीतील बीडीडी चाळीमधील एका घरात मंगळवारी सकाळी ७ वाजता सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये चार जण भाजले. त्यांना उपचारांसाठी नायर रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातात एक बालक व गंभीररीत्या भाजलेली एक व्यक्ती अपघातग्रस्त विभागात तासन् तास पडून होते; मात्र रुग्णालयाचा एकही डॉक्टर त्यांची तपासणी करण्यासाठी आला नाही. याबाबत या रुग्णांसोबत असलेल्या कुटुंबीयांनी हा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल केला. या व्हिडीओमध्ये डॉक्टर खुर्चीवर बसलेले असून, मूल आणि व्यक्ती वेदनांनी ओरडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने घेतला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. तसेच ही चौकशी उपअधिष्ठाता करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

"दोन्ही रुग्ण गंभीररीत्या भाजलेले असताना उपस्थित डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करायला हवे होते; मात्र तसे घडले नसल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली असून, डॉक्टर आणि परिचारिकेची चौकशी सुरू केली आहे. संपूर्ण चौकशीनंतर त्यांच्यावरील कारवाईची भूमिका स्पष्ट केली जाईल."

- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: एसटीचे स्टेरिंग निवडणूक आयोगाच्या हाती; कोकणातील मतदारांची आपल्या गावी जाऊन मतदान करण्यासाठी धडपड सुरू

Baramati Assembly Election : बारामतीकर साहेबांना साथ देतील; युगेंद्र पवार यांचा विश्वास

EVM Issues In Pune: "आम्ही चुकलो तर कारवाई, मग तुमचं काय?"; पुण्यात EVM मशीनमध्ये बिघाड, कोथरुडमधील युवतीचा आक्रमक सवाल

Nashik Vidhan Sabha Election 2024 : माझे वोट, माझी ताकद! पोलिस आयुक्तांचे मतदानाचे आवाहन

Ajit Pawar : विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका? वाचा काय म्हणाले अजित पवार

SCROLL FOR NEXT