Worli hit-and-run case accused Mihir Shah sent to 14 days Judicial custody police Use private vehicle for accursed  
मुंबई

Worli Hit-and-Run Case : पोलिसांचं नेमकं काय सुरूए? मिहीर शहाला काळ्या काचांच्या खासगी गाडीतून नेलं कोर्टात

रोहित कणसे

मुंबईतील वरळी परिसरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाची पोलीस कोठडी आज संपली होती. ही पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपी मिहीर शहा याला शिवडी न्यायालयात आज हजर केले. यानंतर मिहीर शहा याला ३० जुलै पर्यंत १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

खासगी गाडी का?

यादरम्यान आरोपी मिहीर शहाला आज कोर्टात घेऊन येत असताना तसेच परत नेताना पोलिसांकडून खासगी गाडीचा वापर झाल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर आता आरोपीला घेऊन जाताना खासगी गाडी का वापरण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहेत. तसेच यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे मिहीर शहाला घेऊन जाताना वापरण्यात आलेली ही खाजगी गाडीच्या काचा काळ्या असल्याचे देखील समोर आले आहे.

वरळी येथील हिट अँड रन प्रकरणात एका महिलेचा जीव घेतल्यानंतर मिहीर शहा दोन दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर मुख्य आरोपी मिहीर शहा (वय २४) याला नऊ जुलै रोजी बेड्या ठोकण्यात आल्या. हा अपघात झाला तेव्हा कारमध्ये मिहीर शाह आणि राजऋषी बिदावत हे उपस्थित होते. दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे.

नेमकं झालं काय होतं?

तीन मित्रांसोबत मिहीर याने मद्यप्राशन आणि जेवण केले. त्यानंतर रात्री ११.१५च्या सुमारास हे चौघे या बारमधून बाहेर पडले. अपघात घडलेल्या बीएमडब्ल्यूमध्ये बसले. ही गाडी बोरिवलीच्या दिशेने निघाली. बोरिवली परिसरातच राहणाऱ्या तिन्ही मित्रांना घरी सोडल्यावर मिहीरने चालक बिदावत याच्याकडे लाँग ड्राईव्हला जाण्याची इच्छा व्यक्त केली.

गाडी मरीन ड्राईव्ह परिसरात आली. तेथून परत घरी जाताना मिहीरने गाडी चालविण्यास घेतली. पहाटे साडेपाचच्या सुमारास वरळी येथे मिहीरच्या गाडीने प्रदीप व कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. धडकेमुळे दोघे बीएमडब्ल्यूच्या बोनेटवर आले. त्याच वेळी मिहीर याने ब्रेक दाबला. या झटक्यामुळे प्रदीप डाव्या बाजूने खाली पडले. मात्र कावेरी यांची साडी चाकात गुरफटली. त्यामुळे त्या बोनेटवरून सरकून चाक आणि बंपरमध्ये अडकल्या.

याची जाणीव कार चालविणाऱ्या मिहीरला आणि पेशाने चालक असलेल्या बिदावत याला होती; तरी त्याच अवस्थेत दोन किलोमीटर अंतर कापल्यावर मिहीरने गाडी थांबवली. चालकाच्या मदतीने कावेरी यांना बाहेर काढले. रस्त्यावर ठेवले. तेथे चालकाने गाडीचा ताबा घेतला. त्याने कावेरी यांच्यावरून पुन्हा गाडी चढवत पुढे नेली.

ही गाडी वांद्रे कलानगर येथे बंद पडली. तत्पूर्वी मिहीरने शिवसेनेचे उपनेते असलेल्या आपल्या वडिलांना, राजेश शहा यांना फोनवरून सर्व हकिगत सांगितली; मात्र मिहीरला पोलिस ठाण्यात पाठवण्याऐवजी शहा यांनी पळून जाण्याचा सल्ला दिला. तसेच अपघाताची जबाबदारी चालक बिदावत याच्यावर ढकलण्याचा कट आखला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT