मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणी मोठी घडामोड घडली आहे. यातील प्रमुख फरार आरोपी मिहीर शहा याला अखेर अटक झाली आहे. शहापूर येथून महिरसह त्याला मदत करणाऱ्या १० ते १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये मिहिर शहाची आई आणि बहिणीचाही समावेश आहे. (Worli hit and run case fugitive Mihir Shah finally arrested by mumbai police)
वरळी अपघात प्रकरणात मिहीर शहा मुख्य आरोपी असल्याच समोर आलं आहे. मिहीर शहानं अपघात केल्यानंतर पळ काढला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास केला होता आणि अखेर त्याला शहापूरमधून अटक करण्यात आली. गुन्हे शाखेने मिहीर शहाला मदत करणाऱ्या १२ लोकांना देखील ताब्यात घेतले आहे.
या लोकांनी मिहीरला पळून जाण्यात मदत केली होती आणि त्याच्यावर पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण केला होता. यापूर्वी, मिहीर शहाचे वडिल राजेश शाह यांना देखील अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना जामीन मिळाला. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली असून मिहीर शहा हा मुख्य आरोपी आहे. या अटकेनंतर प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे आणि आणखी काही लोकांच्या अटकेची शक्यता आहे.
याप्रकरणी भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं की, पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणात अनेक गोष्टी घडल्या. ब्लड सॅम्पल्सचा रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न झाला. याकडं पोलिसांचं दुर्लक्ष केलं. पोलिसांनी जी कारवाई केली, त्याप्रमाणं तर ही परिस्थिती नाही ना? ६० तास झाले मिहिर शहा होता कुठे? याच्यामागे सत्ताधारी लोकांचा हाथ असल्याची शक्यता आहे.
वरळीतील अॅस्ट्रिया मॉलजवळ मिहीर शहा चालवत असलेल्या बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरुन एक दाम्पत्य प्रवास करत होतं. अपघातानंतर दुचाकीवरील महिला कारच्या पुढच्या चाकाखाली अडकली. पण तरीही चालकानं कार तशीच पुढे दामटली यामध्ये या महिलेला फरफटत नेण्यात आलं. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला आहे.
कारचा मालक राजेश शहा हा शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी आहे. उपनेता म्हणून राजेश शहा शिवसेनेत कार्यरत आहे. दरम्यान, कारची नंबर प्लेटही गायब झाली आहे. अपघतावेळी कारमध्ये मिहीर शहा आणि ड्रायव्हर होता. कार महिर शहा चालवत असल्याचा आरोप पीडित पतीनं केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.