Worli Hit and Run esakal
मुंबई

Worli Hit and Run: तीन दिवसांनी आरोपीला अटक, मेडिकलमध्ये मद्य प्राशन केलेलं कसं कळणार? वरळी हिट अँड रन'वर मोठा प्रश्न!

Sandip Kapde

मुंबईच्या वरळी येथील हिट अँड रन अपघातात महिलेचा जीव गेला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा (23) याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवस पोलिसांना गुंगारा देत असलेल्या मिहीरला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी मिहीरच्या अटकेची पुष्टी केली आहे. मिहीरसोबत त्याला पळवून लावणाऱ्या, घरात आसरा देणाऱ्या आणखी ११ ते १२ कुटुंबीय आणि मित्रमंडळींनाही ताब्यात घेण्यात आले आहे, मात्र चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.

पोलीस कोठडी आणि तपास

अपघाताच्या वेळी मिहीरसोबत गाडीत असलेल्या राजऋषी बिदावत याला मंगळवारी शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठवले. अपघाताआधी आणि नंतर घडलेल्या घटनांचा तपास करून पुरावे गोळा करणे आवश्यक असल्यामुळे बिदावतला आणि मिहीरला समोरासमोर बसवून चौकशी करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले. न्यायालयाने हे मान्य करत बिदावतला ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

वर्षा गायकवाड यांची मागणी

वरळी हिट अँड रन प्रकरणी खासदार वर्षा गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाला हिट अँड रन नव्हे, तर मर्डर केस मानले पाहिजे अशी मागणी केली आहे. कारण जेव्हा ही दुर्घटना घडली, तेव्हा नाखवा आणि त्यांच्या पत्नीने त्यांना गाडी थांबवायला सांगितले होते. मात्र, त्यांनी गाडी न थांबवता ती भरधाव वेगाने मुंबई सीलिंकजवळ नेली आणि तिथेच त्या महिलेचा मृतदेह सापडला. त्यामुळे आमची मागणी आहे की या प्रकरणात कलम 302 आणि कलम 103 लावण्यात यावे, असे गायकवाड म्हणाल्या.

गुन्हा घडून जवळपास दोन ते तीन दिवस झाले आहेत, त्यामुळे आता मेडिकल केले तरी त्याने मध्य प्राशन केले आहे का हे कसे कळेल? आणि त्याचबरोबर आतापर्यंत जेवढ्या हिट अँड रन केसेस झाल्या त्या प्रत्येकामध्ये सीसीटीव्ही हे देण्यात आले आहेत. मात्र, प्रमोद नाखवा यांना अजून पर्यंत सीसीटीव्ही का देण्यात आले नाहीत? नाखवा यांचा त्या सीसीटीव्ही फुटेजवर संपूर्ण अधिकार आहे. त्यामुळे यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. मुंबई पोलिसांचा क्रमांक हा जगात स्कॉटलंड नंतर लागतो, त्यामुळे तशी गनिमा राखली गेली पाहिजे, असे देखील वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

या प्रकरणावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की मिहीर शहा दारूच्या नशेत असताना हा अपघात घडला. ६० तासात सगळं रक्तातून वाहून गेले असल्यामुळे आता मेडिकल तपासणी केली तरी काही मिळणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT