Worli Hit and Run update in marathi esakal
मुंबई

Worli Hit and Run: गर्लफ्रेंडच्या चौकशीनंतर मिहिर शहाच्या वडिलांना अटक! पोलिसांनी कसा रचला सापळा?

Sandip Kapde

वरळी हिट अँड रन प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी मिहिर शहा याला अटक केली आहे. यावेळी त्याच्या गर्लफ्रेंडचीही पोलिसांनी चौकशी केली. यापूर्वी पोलीस तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, मिहिर शहा हा शिवसेनेच्या उपनेता राजेश शहा यांचा मुलगा आहे.

पोलीस तपासात असे उघड झाले आहे की, अपघाताच्या वेळी मिहिर शहा आणि त्याचा ड्रायव्हर पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये होते. मिहिर शहाने आपली कार एका महिलेवर चढवली आणि त्यानंतर अपघाताच्या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी मिहिरच्या वडिलांना, शिवसेनेच्या पालघर उपनेता राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे.

अपघातानंतर मिहिर शहा गोरेगावमध्ये आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचला आणि आपला मोबाईल फोन बंद केला. यानंतर तो फरार झाला. वरळी पोलिसांनी वाहनाच्या तपासणीसाठी आरटीओ आणि फॉरेंसिक टीमला बोलावले आहे होते. तर मिहिर शहाचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याची लोकेशन ट्रेस करत होते. त्यानंतर वरळी पोलिसांनी मिहिरच्या गर्लफ्रेंडची देखील चौकशी केली.

आरोपी मिहिरने सकाळी आठ वाजता गोरेगावहून निघून, आपल्या गर्लफ्रेंडच्या घरातून बँड्राला जाण्याचे सांगितले होते आणि नंतर त्याने आपला फोन बंद केला.

जुहू येथील वाईस ग्लोबल तापस बारमध्ये महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. या कारवाईसाठी विभागाने विशेष पथक तयार केले असून, बारमधील अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन तपासण्यासाठी या टीमने तपास सुरू केला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बारमधील मद्याचे साठे, विक्रीचे रेकॉर्ड आणि परवाने यांची तपासणी केली आहे. या तपासात अनधिकृत मद्य साठवणूक, विक्री आणि परवाना नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. बारच्या मालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT