मुंबई : लोकलच्या मोटरमॅन कॅबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याच्या निर्णयाविरोधात आज ( ता.२५) सीएसएमटीमध्ये मोटरमन आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची बैठक पार पडली आहे. मात्र, मध्य रेल्वेने मोटरमन आणि संघटनेचा पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी मागितला आहे. परंतु, तेव्हापर्यत मोटरमननी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नयेत असे आवाहन मध्य रेल्वेने मोटरमनला केल्याची माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने दिली आहे.
लोकलच्या मोटरमॅनकडून अनेकदा स्थानकातील थांबा विसरणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, लाल सिग्नल असतानाही गाडी पुढे नेणे अशा घटना घडतच असतात. अशा घटनांचे प्रमाण कमी असले तरी त्यामुळे होणाऱ्या अपघाताची शक्यता असते.
अशा घटनांमागील नेमक्या कारणांचा शोध घेता यावा, पुरावे मिळावेत यासाठी लोकलमधील मोटरमन आणि गार्ड केबिनच्या आत-बाहेर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरामुळे मोटरमननी त्यांच्या गोपनीयतेबद्दल रेल्वे कामगार संघटनानी चिंता व्यक्त केली आहे. तसेच सीसीटीव्हीमुळे कर्मचाऱ्यांवर तणाव येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात मध्य रेल्वे पत्र सुद्धा सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने दिले होते.
मात्र, यावर मध्य रेल्वेकडून कोणतेही दखल घेतली नव्हती. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेराविरोधात सोमावरी सीएसएमटीमध्ये मोटरमन आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मोटरमॅन कॅबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याच्या निर्णयाचा सर्वानी एकमतानी विरोधात दर्शविला असल्याची माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या नेत्यांनी सकाळला दिली आहे.
चर्चेसाठी वेळ मागितली
मोटरमनच्या सीसीटीव्ही कॅमेराला विरोध बघता मध्य रेल्वेने सावधगिरीची भूमिका घेतली आहे. मध्य रेल्वेने मोटरमन आणि रेल्वे कर्मचारी संघटनेला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन तीन दिवसांचा कालावधी मागितला आहे. यांसंदर्भातील लिखित पत्रही सेंट्रल रेल्वे मजदूर संघा देण्यात आले आहे. परंतु, तेव्हापर्यत मोटरमननी कोणतेही पाऊल उचलू नयेत असे आवाहन सुद्धा मध्य रेल्वेने मोटरमनला करण्यात आलेला आहे.
मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेराविरोधात सर्व मोटरमन सोबत आज बैठक झाली. त्यानंतर आता मध्य रेल्वेने चर्चेसाठी दोन ते तीन दिवसांना कालावधी मागितला आहे. त्या संदर्भात आम्हाला लेखी पत्र सुद्धा देण्यात आले आहे.
- विवेक सिसोदिया, अध्यक्ष, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ मुंबई विभाग
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.