मुंबई: भरधाव वेग, खड्डे, ओव्हरटेक आणि बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने महामार्गावरील रस्ते अपघातांमध्ये गेल्या वर्षी वाढ झाली होती. तर अपघाती मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त होते. मात्र यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल सुमारे 8 हजार अपघात घट झाली आहे. मृत्यूच्या प्रमाणावरही परिणाम झाला आहे.
राज्यातील महामार्गावर गेल्या वर्षी वाहनांच्या रस्ते अपघाताच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. भरधाव वेग, नियम मोडणे, ओव्हरटेक करणे या अपघाताला कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान अपघाताच्या आकडेवारीत घट झाली आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते जूनपर्यंत अपघातामध्ये वाढ होती. त्यानंतर जुलै ते ऑक्टोबर दरम्यान अपघाताची संख्या घटली. त्यातुलनेत यावर्षी कोरोना काळामुळे जानेवारी ते मार्च अपघाताची संख्या जास्त होती. मात्र त्यानंतर सप्टेंबरपर्यंत घट होऊन पुन्हा ऑक्टोबरमध्ये अपघात वाढल्याचे दिसून येत आहे.
अधिक वाचा- एमएचटी-सीईटी 2020 परीक्षेचा निकाल जाहीर
मात्र, एकूणच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे 8 हजार अपघात कमी झाले, त्यामूळे अपघाती मृत्यू आणि गंभीर जखमी होण्याची संख्येत ही घटली आहे. कोरोना काळामुळे महामार्गांवर वाहनांची संख्या कमी होती. त्यामुळेच हे अपघात कमी झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. मात्र अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी होणे सुद्धा दिलासादायक असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले आहे.
महिने - वर्ष 2019 | एकूण अपघात/एकूण मृत्यू |
जानेवारी | 3245 / 1235 |
फेब्रुवारी | 2795 / 1145 |
मार्च | 3030 / 1178 |
एप्रिल | 2760 / 1120 |
मे | 3228 / 1306 |
जून | 2806 / 1085 |
जुलै | 2555 / 984 |
ऑगस्ट | 2405 / 857 |
सप्टेंबर | 2248 / 784 |
ऑक्टोबर | 2201 / 815 |
एकूण | 27273 /10509 |
वर्ष 2020 | एकूण अपघात / एकूण मृत्यू |
जानेवारी | 2948 /1157 |
फेब्रुवारी | 2821 / 1161 |
मार्च | 2282 / 943 |
एप्रिल | 576 / 300 |
मे | 1335 / 678 |
जून | 1763 / 916 |
जुलै | 1596 / 752 |
ऑगस्ट | 1873 / 884 |
सप्टेंबर | 1948 / 891 |
ऑक्टोबर | 2410 / 1065 |
एकूण | 19552 / 8747 |
--------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
This year reduction in road accidents highways with about 8 thousand fewer accidents
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.