मुंबई : सोशल मीडियाचे चांगले उपयोग करण्यापेक्षा लोकांकडून याचा दुरुपयोग अनेकांकडून जास्त केला जातो. WhatsApp, Facebook, Instagram, यासारख्या ऍप्स तरुणाईमद्धे प्रचंड क्रेझ आहे. WhatsAppवर कॉलेजचे, शाळेचे, मित्रांचे अनेक ग्रुप्स असतात. या ग्रुप्सवर मोठ्या प्रमाणावर मेसेजेसची देवाण घेवाण होत असते. बहुतांश वेळेला एखाद्या ग्रुप मेंबरला टार्गेट करून देखील बोललं जातं. त्यामुळे अनेकांची मानसिक स्थितीही खालवते.
अशीच एक हृदयद्रावक घटना मुंबईच्या सांताक्रूझ भागात घडली आहे. WhatsApp वर मित्रांनी चिडवलं म्हणून एक विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव जित असर असं आहे. जित अवघ्या १७ वर्षांचा होता. जित दररोज WhatsApp च्या माध्यमातून आपल्या मित्रांशी बोलायचा. 'नमुने' नावाच्या या WhatsApp ग्रुपवर जित आणि त्याचे काही मित्र होते. महाशिवरात्रीच्या दिवशी जितच्या मित्रांनी त्याला चिडवलं.याच गोष्टीमुळे डिप्रेशनमध्ये जाऊन जितनं स्वत:चं आयुष्य संपवलं. महाशिवरात्रीच्या दिवशी जितनं घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूनंतर त्याचा मोबाईल बघितल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. यास संपूर्ण घटनेमुळे जितच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
जितसारखे असे अनेक अल्पवयीन विद्यार्थी आहेत जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. मात्र आपली मुलं मोबाईलवरून कोणाशी बोलतात, काय बोलतात यावर नजर ठेवण्याची जवाबदारी पालकांनी आता पार पाडण्याची गरज आहे. तुमचा मुलगा किंवा मुलीला त्यांचे मित्र-मैत्रिणी काय म्हणतात, त्यांच्याशी काय बोलतात या सगळया गोष्टींवर पालकांनी नजर ठेवण्याची गरज आहे. या सगळया माध्यमांच्या अतिवापरामुळे अल्पवयीन मुलांमध्ये सहनशक्तीचं प्रमाण कमी होतंय. मुलांची मानसिक स्थिति यामुळे खालावत चालली आहे. त्यामुळे आता सोशल मीडियाच अल्पवयीन मुलांचा जीव घेतोय, असं म्हंटलं तर वावगं ठरू नये.
मोठी बातमी - ...अन् कोरोना शोधण्यासाठी अधिकारी घरोघरी!
त्यामुळे यासगळया प्रकरणात नक्की कोणाला जवाबदार मानायचं हा मोठा प्रश्न जितच्या पालकांसमोर आहे. पालकांनी वेळीच आपल्या पाल्यांकडे लक्ष दिलं नाही तर असे जितसारखे अनेक अल्पवयीन विद्यार्थी आपलं आयुष्य संपवतील. त्यामुळे याबाबतीत सर्वांनाच सतर्क राहण्याची गरज आहे.
Young boy took extreme step after teasing by friends on whatsapp group
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.