मुंबई

'या' तरुणीने केलं असं काही, आता संपूर्ण उल्हासनगरमध्ये होतेय जोरदार चर्चा 

सकाळवृत्तसेवा

उल्हासनगर : लॉकडाऊनमध्ये जिवाच्या आकांताने नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यात येत असल्यावरही दुचाकीस्वार या आवाहनाला जुमानत नसल्याचे बघून मिलिट्री स्कुलची विद्यार्थीनी पोलिसांच्या मदतीला उभी राहिली आहे.ते बघून उल्हासनगरात मिलिट्री आल्याच्या भीतीने दुचाकीस्वारांनी नेहरू चौक परिसरात गाड्या वळवणे सोडले आहे.

शत्रूने देशावर हल्ला केल्यास सुट्टीवर आलेला सैनिक कधीच घरी थांबत नाही. तो ताडकन सीमेवर जाण्यासाठी तैनात होतो. हे हिंदी चित्रपटात नेहमीच दाखविले जाते. काहीसा असाच प्रकार उल्हासनगर कॅम्प 2 मधील नेहरू चौकात पाहण्यास मिळत आहे. कोरोना हा शत्रूच्या रुपात अवतरला असून या शत्रूवर मात करायची असेल तर घरीच थांबा, फिरू नका, दुचाक्या बाहेर काढू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलिस विभागाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. पण तरीही निगरगट्ट तरुण त्यास जुमानत नसल्याचे चित्र बघून मिलिट्रीच्या वेशातील एक तरुणी वाहनाची तपासणी करणाऱ्या पोलिसांना मदत करताना दिसत आहे. त्यामुळे उल्हासनगर शहरातील मोकाट वाहनचालकांना नियंत्रणात आणण्यासाठी मिलिट्री तैनात केल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. 

या तरुणीचे नाव सिमरन राजकुमार मनसुखानी आहे. ती सातारा मिलिट्री स्कुलची विद्यार्थिनी होती. तिने मिलिट्रीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तिच्याकडे मिलिट्री स्कुलचा गणवेश आहे. महाराष्ट्र पोलिसांकडे महिला पोलिसांची पर्याप्त  कुमक नाही. नेहरू चौकात तैनात असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत होता. हे बघून मन बैचैन अस्वस्थ झाले. मिलिट्री प्रशिक्षण घेतल्याने त्यांच्या आतील सैनिक जागा झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांची भेट घेऊन पोलिसांच्या मदतीला उभे राहण्याची तयारी दर्शवली. त्यांनी पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डी.डी. टेळे यांची अनुमती घेतली आणि मला पोलिसांसोबत उभे राहण्याची परवानगी दिल्याची माहिती सिमरन मनसुखानी हिने दिली. 

नेहरू चौक परिसरात सिमरन ही पोलिसांसोबत मिल्ट्रीच्या गणवेशात उभी राहते. गाड्या थांबवून चौकशी करते. त्यामुळे मोकाट मंडळींवर वचक बसत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.

young girl used her military training during corona virus covid 19 crisis at ulhasnagar


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT