young man commits suicide after harassment of traffic police thane NCP MLA Jitendra Awhad tweet  
मुंबई

Traffic Police : सैन्यात भरती होण्याचं स्वप्न अधुरंच...; वाहतुक पोलिसांचा जाचामुळे तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

तरुणाने पाठवलेला शेवटचा संदेश समोर आला आहे.

रोहित कणसे

ठाणे शहरात एका सैन्य आणि पोलिस दलात भरतीची तयारी करत असलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचा भीषण प्रकार नुकताच समोर आला आहे. या तरुणाने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता या तरुणाच्या आत्महत्येमागचं संतापजनक कारण समोर आलं आहे.

या तरुणाने जीवन संपवण्याआधी कुटुंबियांना पाठवलेला संदेश समोर आला असून वाहतूक गटारीच्या दिवशी गाडी चालवताना वाहतूक पोलिसांची कारवाई केल्यानंतर पोलिसांनी करिअर संपविण्याची भिती घातल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची बाब उघड झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटच्या माध्यमातून या तरूणाचा फोटो आणि अखेरचा संदेश शेअर केला आहे.

मनिष उतेकर (२४) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून जितेंद्र आव्हाडांनी " ह्या आत्महत्येला जबाबदार कोण...कारवाई कधी मुजोरी वाढली…" असं ट्वीट केलं आहे. यासोबत त्यांनी मनिषचा फोटो आणि त्याने पाठवलेल्या अखेरच्या संदेशाचा स्किनशॉट देखील शेअर केला आहे. या घटनेबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

अखेरचा संदेश आहे तसा...

"मी मनिष उतेकर, गटारीच्या दिवशी माझी गाडी कोपरी ठाणे ईस्ट या भागात ट्राफिक पोलीस मोरे साहेब यांनी रात्रीच्या वेळी ड्रिंक आणि ड्राइव्ह मध्ये पकडलेली. मी आर्मी भरती, पोलीस भरती देणारा विद्यार्थी आहे. गाडी पकडलेली त्यात त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही उद्या या आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा गेलो माफी मागितली आणि जे काय असेल ते दंड तिथेच भरायला तयार होतो पण त्यांनी मला धमकी देऊन सांगितलं कोर्टात जावं लागेल. माझ्या समोर कित्येक बाईक लाच घेऊन पैसे घेऊन सोडून दिले त्यांनी..."

"मी परत तिसऱ्या दिवशी गेलो माफी मागितली सांगितलं साहेब माझं करिअर सर्व संपून जाईल कोर्टात गेलो तर तुम्ही दंड काय असेल ते घ्या मी देतो हिते ट्राफिक पोलीस पुष्पक साहेब, ट्राफिक पोलीस सुधाकर साहेब यांनी मला धमकी दिली तुझं करिअरच बरबाद करायचं आहे, भीती दाखवून दिली. या सर्व भीती मुळे आज मी आत्महत्या करत आहे."

"आज ही माझ्यावर वेळ आले उद्या अशी वेळ कोणावर यायला नको, मी सर्व ट्राफिक पोलिसांचा मान ठेवतो but अस कधी कोणासोबत वागू नका जेणेकरून समोरचा माणूस प्रेशर टेन्शनमुळं आत्महत्या करेल म्हणून मी हे सर्व मेसेज करून ठेवत आहे आणि ती गाडी माझ्या मित्राची आहे. त्यांची काही चुकी नाही/ बस ट्राफिक पोलीस सुधाकर साहेब, ट्राफिक पोलीस पुष्कर साहेब यांच्या दबावामुळे मी आज आत्महत्या करत आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT