मुंबई: कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे (heavy rain) महाडमध्ये भीषण पूरस्थिती (Mahad flood situation) निर्माण झालीय. महाडमधून वाहणाऱ्या सावित्री नदीने (savitri river) रौद्र रुप धारण केले आहे. महाडमध्ये तर लोकं जीव वाचवण्यासाठी एसटीच्या टपावर (st bus) बसले आहेत. इतकी भीषण परिस्थिती तिथे आहे. दरम्यान महाडमधील या भीषण पूरस्थिती दरम्यान अक्षय भोसले या तरुणाने फेसबुक LIVE करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदत मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Youth did fb live from Mahad flood situation request raj thackeray to send hepl dmp82)
"आम्ही एकाठिकाणी फसलोय. महाडमध्ये महापूरआलाय. सकाळी जेवढं पाणी होतं, त्यावेळी नेते मदत करु शकत होते. पण कोणी कुठलीही मदत केलेली नाही. आता पाणी वाढत चाललय. लोक फसले आहेत. कोकणातल्या एकाही नत्याने एक रुपयाचंही काम केलेलं नाही" असं अक्षय व्हिडिओमध्ये सांगत आहे.
"आमच्यासमोर आता शेवटचा पर्याय म्हणजे राज ठाकरे आहेत. त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी मी फेसबुक लाईव्ह करतोय. पाण्याचा प्रवाह वाढतोय, बॅटरीची समस्या आहे. पाण्याचा जोर वाढतोय, कधीही काहीही होऊ शकतं. तुम्हाला शक्य असेल, त्या मार्गाने हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कोणीही मंत्री काहीही करणार नाही. पण राज ठाकरेंनी दोन ते तीन हेलिकॉप्टरची सोय करावी. लोक अडकली आहेत" असं या तरुणाने एफबी लाइव्ह संपवताना म्हटलं आहे.
महाड तालुक्यातील खरोखरच स्थिती गंभीर आहे. नाते रोडवर तळीये गावात दरड कोसळली आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 32 घरावर ही दरड कोसळली असून यामध्य 72 जण बेपत्ता असल्याची माहिती समजत आहे.
दरड कोसळून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये जखमी किंवा जीवित हानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र या दुर्घटनेत अंदाजे 72 लोक बेपत्ता असल्याच सांगितलं जातं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.