corona vaccine sakal media
मुंबई

'झायडस' लस ठरु शकते प्रभावी, गंभीर दुष्परिणाम नाहीत, जाणून घ्या सविस्तर

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईसह (Mumbai) देशभरात कोविशिल्ड,कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक अशा तीन लसींचे ट्रायल (Vaccines Trail) झाले आणि चांगल्या परिणामांनंतर (Good Impact) त्यांच्या तात्काळ वापराला परवानगी मिळाली. सूत्रांच्या माहितीनुसार, शहरात झायडोस कॅडिलाद्वारे तयार केलेली झायकोव्ह- डी ची कार्यक्षमता ही चांगली आहे. ही लसीची चाचणी (Vaccine Test) अद्याप पूर्ण झाली नसली तरी 5 वेळा पाठपुरावा केल्यानंतर ही लस प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. ( Zaydus Corona vaccine may impactful clinical trail starts in JJ hospital-nss91)

झायडोसने बनवलेल्या झायकोव्ह- डी लसीची चाचणी देशभरातील सुमारे 28000 लोकांवर सुरू आहे. तिसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी मुंबईच्या जेजे ग्रुप ऑफ रुग्णालयाचीही निवड झाली. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाने चाचणीसाठी 2737 सुदृढ लोकांची निवड केली. या सर्व लोकांना लस देण्यात आली आहे. लस दिल्याच्या 5 महिन्यांनंतर फक्त 22 लोक पाॅझिटिव्ह आढळले आहेत. मात्र, चांगली गोष्ट अशी आहे की आजपर्यंत कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसलेले नाहीत आणि ही लस घेतल्यानंतर संक्रमित झालेल्या व्यक्तींना फक्त सौम्य आणि मध्यम लक्षणे दिसली आहेत. या संशोधनाचे नेतृत्व करणारे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी चाचणीसंदर्भात माहिती देण्यास नकार दिला मात्र, लस घेतल्यानंतर लोकांना कोणतेही गंभीर दुष्परिणाम नसल्याच्या बातमीला दुजोरा दिला. चाचणी अजून सुरू असल्याचेही त्यांनी साांगितले.

एक वर्ष चालणार ट्रायल

आम्ही 15 फेब्रुवारी रोजी ट्रायल सुरू केली. या चाचणीत केवळ असेच लोक घेतले गेले ज्यांचा आरटीपीसीआर आणि अँटीबॉडीजचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.  ही चाचणी संपूर्ण वर्षभर चालेल आणि केवळ  मुंबईचा अहवाल नाही तर देशात सुरू असलेल्या सर्वांचा अहवाल तपासून  ही लस किती प्रभावी आहे हे कळेल. आम्ही नुकतेच 5 फॉलो अप पूर्ण केले आहेत.

आकाश खोब्रागडे डॉ अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

दुसरी स्वदेशी लस लवकरच उपलब्ध होणार

कोव्हॅक्सिन नंतर झायडोसची झायकोव्ह-डी ही दुसरी स्वदेशी लस आहे. सध्या पालिकेच्या केईएम रुग्णालयात आणखी एका स्वदेशी लसीची ट्रायल सुरु आहे. कोवोवॅक्स असे या लसीचे नाव आहे. सीरम इन्स्टिट्यूटतर्फे या लसीची ट्रायल सुरू आहे. परंतु, भारतीय बाजारात ही लस येण्यासाठीही वेळ लागणार आहे. तर, कंपनीने झायकोव्ह-डीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून परवानगी मागितली आहे. मंजूरी मिळाल्यानंतर झायकोव्ह-डी जगातील पहिल्या डीएनए-आधारित लसीचा दर्जा प्राप्त करेल.

सुईशिवाय लस, 3 वेळा घ्यावा लागणार डोस

झायकोव्ह-डी ही एक सुईशिवाय घ्यावी लागणारी लस आहे. ही इंट्रा-डर्मल लस आहे, ज्यास स्नायूंमध्ये इंजेक्शनची लावण्याची आवश्यकता नसते. या लसीचे 3 डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा 28 व्या दिवशी आणि तिसरा 52 व्या दिवशी घ्यावा लागतो. एका वेळी दोन्ही हातांना 0.2 मिली एवढ्या प्रमाणात लस दिली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान नसतं तर निवडणूक आयोगच नसतं' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT