सोलापूर : मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेत बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक घेतली जाणार आहे. घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमिनीची शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा मोजणी केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना नदीच्या बाजूला जमीन असतानाही कोरडवाहू जमीन म्हणून ज्यांना मोबदला मिळाला, त्या शेतकऱ्यांना बागायत जमिनीचा मोबदला देण्याचा निर्णय आज झाला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सात रस्ता येथील नियोजन भवनात मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसासिंचन योजना व घाटणे बॅरेजमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बैठक झाली. या बैठकीनंतर उमेश पाटील यांनी ही माहिती दिली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, उजनीचे ना. वा. जोशी, भूसंपादन विभागाचे मोहोळ येथील अधिकारी व्ही. एल. गायकवाड, कृषी उपसंचालक आर. टी. मोरे उपस्थित होते.
उमेश पाटील म्हणाले, आष्टी उपसा सिंचन योजनेतील कोन्हेरी, शेटफळ यासह इतर गावातील काही शेतकऱ्यांना जमीन संपादनाची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. त्यांना ही रक्कम मिळावी, ज्या शेतकऱ्यांचे मूल्यांकन करताना फळबागा व झाडांना वगळण्यात आले होते त्यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. आष्टीच्या विषयासाठी आतापर्यंत पाच बैठका झाल्या आहेत. आणखी एक किंवा दोन बैठकांमध्ये हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. घाटणे बॅरेजच्या विषयासाठी आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. आम्ही केलेल्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गावर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील मार्गावर दरवर्षी अनेक अपघात होतात. या अपघातात दरवर्षी साधारणता ४ हजार जणांचा मृत्यू होतो. त्याच-त्या ठिकाणी वारंवार अपघात होतात. ज्याठिकाणी वारंवार अपघात होतात त्याठिकाणी रस्ते सुरक्षेची उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेआहे.
- उमेश पाटील, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.