आज जगात लोक विविध प्रकारच्या ताणतणावांना सामोरे जात आहेत. ताण आणि तणाव ही आम्ही दिलेली नवीन नावे आहेत. प्राचीन काळात याला अज्ञान असे म्हणत असत. आज आपण याला ताणतणाव म्हणतो. त्यांचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल बरेच काही बोलले जाते. तुम्ही तुमच्या ताण-तणावाचे व्यवस्थापन का करू इच्छिता? मी समजू शकतो, की तुम्ही तुमची मालमत्ता, व्यवसाय किंवा कुटुंब यांचे व्यवस्थापन करू इच्छित आहात. मात्र, तुम्हाला तुमचा ताण का व्यवस्थापित करायचाय? तुम्ही करत असलेल्या कामामुळे तुमच्यावर ताण येत नाहीये. तुमच्या शरीर प्रणालीचे योग्य व्यवस्थापन करण्यास तुम्ही असमर्थ आहात, म्हणून तुमच्यावर ताण येत आहे. तुमचे काम हा ताण नाही, तुमचे काम म्हणजे तणावही नाही. तुमची प्रणाली – अर्थात तुमचे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा - एका विशिष्ट मार्गाने ठेवण्यात तुमची असलेली असमर्थता म्हणजे ताण-तणाव आहे. स्वत:ला विशिष्ट पातळीवर आरामात आणि कल्याणात ठेवण्याची असमर्थता आणि तुमची स्वतःची शक्ती आणि कार्यक्षमता उत्तमरीत्या हाताळण्याच्या तुमच्या असमर्थतेमुळे ताणतणाव निर्माण होत आहे.
आपण ध्यान म्हणून ज्याचा उल्लेख करतो तो केवळ यासाठीच. तो उपाय नाही, तर एखाद्या व्यक्तीला अशा परिमाणात जाण्याची संधीदेखील आहे. जिथे आपल्यामध्ये तणाव असलेली कोणतीही गोष्ट नाही. मी म्हटल्याप्रमाणे, तणाव असे काहीतरी आहे ज्याला आम्ही काही काळापूर्वी अज्ञान असे म्हणायचो. एखाद्याच्या मनात स्वत:बद्दल पूर्णपणे सुस्पष्टता असल्यास तणावाचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून ध्यान ही तुम्ही करण्याची नाही, तर ही तुम्ही अनुभवण्याची गोष्ट आहे. ती कृती नाही. तो एक विशिष्ट गुण आहे. तुम्ही तुमचे शरीर, तुमचे मन, तुमची ऊर्जा आणि तुमच्या भावना परिपक्वतेच्या एका विशिष्ट स्तरापर्यंत वाढवल्या तर ध्यानधारणा आपसूकच घडते. आपण माती सुपीक ठेवल्यास, तिला आवश्यक खत आणि पाणी दिल्यास आणि योग्य प्रकारचे बीज असल्यास, ते वाढेल आणि फुले व फळे बहरून येतील. एका वृक्षातून फुले व फळे येतात, त्या आपल्याला हवेत म्हणून नव्हे, तर आपण आवश्यक, अनुकूल वातावरण निर्माण केल्यामुळे. त्याचप्रमाणे, आपण आपल्या शरीरात, आपले मन, आपली ऊर्जा आणि आपल्या भावनांच्या बाबतीत, आपण कोण आहोत या चारही आयामांवर, जर आपण स्वतःमध्ये आवश्यक वातावरण तयार केले तर ध्यान आपणामध्ये नैसर्गिकरित्या फुलेल. हा एक विशिष्ट सुगंध आहे ज्याचा आनंद एखाद्या व्यक्तीस आपल्या आत घेता येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.