Devyani-M. 
myfa

योग ‘ऊर्जा’ : महत्व आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे....

देवयानी एम., योग प्रशिक्षक

‘योगशास्त्र’ ही भारताने संपूर्ण जगाला व मानवतेला दिलेली अमूल्य भेट आहे. ज्यात फक्त शारीरिक आरोग्यच नव्हे, तर बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकासाची किल्ली आहे. शरीर-मनाची, विचार-कृतींची, संयम-समाधानाची व मानव-निसर्गाची एकसंधता, एकात्मता आणि आपल्या आयुष्याचे पूर्णत्व हे योगशास्त्राच्या अभ्यासाने व नियमित सरावाने साध्य होते. आज सर्वत्र सर्वसाधारणपणे योगाचे शारीरिक अंग ‘आसन’ जास्त प्रचलित आहे. परंतु योगाचे व्यायामापलीकडील योगदान अमाप आहे. अशा सागरासारख्या विशाल, ५००० वर्षांचा वारसा असलेल्या शास्त्राला अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे ‘International Day of Yoga’. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे हे सहावे वर्ष.

योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व असे की, तो दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो. उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. या काळात सर्व जीवांना जगवणारी सौरऊर्जा सर्वाधिक प्रभावशाली असते. या ऊर्जेतून सकारात्मकता आणि आत्मविकास वृद्धिंगत व्हावा यासाठी योग दिवसाचे प्रयोजन.

कोणताही दिवस साजरा करण्यामागे त्या विषयाच्या ज्ञानाचा प्रसार, सर्वांमध्ये ऐक्यभाव, आनंद आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी, हा आहे. कुठल्याही गोष्टीचे महत्त्व आपल्याला पटल्यावर ती आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते, पण मधून मधून त्यांना उजाळा दिला की त्यांचे महत्त्व टिकून राहते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यंदाच्या सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे "Yoga at Home, Yoga with Family" म्हणजे ‘घरी राहून योग, कुटुंबासमवेत योग.’ कोरोनाच्या प्रसारामुळे बाहेर जमाव न करता आपल्या घरूनच ऑनलाइन योग सत्रात सामील होऊन हा दिवस साजरा केला जाईल.

1) घराघरात योग -
‘Home is the first school’ असं म्हणतात. जिथून मुले विचारांची दिशा, संस्कार, अवलोकन शिकतात, तिथूनच योग सुद्धा विकासाचा भाग बनला, तर पुढे जाऊन त्या भक्कम व्यक्तिमत्त्वासह ती जगात वावरतील. वयाच्या आठव्या वर्षापासून मुलांना सूर्यनमस्कार, व्यायाम, संस्कृत पठण यांच्या सवयी रुजवून आरोग्याची भेट देणे आवश्यक आहे. यामुळे निरोगी सवयी, आंतरिक बळ आणि समाधानी वृत्ती या गुणांसह बाहेरच्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास मदत होईल. म्हणूनच यावर्षी घरात राहून या थीमसह योगासने, प्राणायाम आणि योग्य आहाराच्या संस्कारांनी आपल्या मुलांचे आयुष्य निरोगी व आनंदी जाईल याची तरतूद करा!

2) भक्कम नात्यासाठी योग -
‘The quality of your life is the quality of your relationship’. योगसाधना चांगल्याप्रकारे होऊ लागल्यावर त्याचे परिणाम नात्यांमध्येही दिसू लागतात. नात्यांमध्ये ताण निर्माण होतात त्याला अनेक बाह्य कारणे आहेत. अनावश्यक गरजा, अपेक्षांचे ओझे, स्वभावाचे कंगोरे, आर्थिक तणाव, व्यसन, चुकीचे प्राधान्यक्रम इत्यादी. नात्यात ‘आपण’ पेक्षा ‘मी’ मोठा झाल्यावर समतोल हरवतो. योग दैनंदिन आयुष्याचा भाग बनल्यास आपल्या शारीरिक मानसिक ऊर्जेला योग्य दिशा मिळेल. निरोगी, शांत, आनंदी मन जीवनातील प्रत्येक पैलूंमध्ये दिसू लागेल. आपले स्वतःबरोबरचे नाते सुधारल्यावर इतरांबरोबरचेही नाते सुधारते. योग आपल्याला ‘Myself’पासून ‘Self’पर्यंत नेतो.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. ‘स्व’स्थ राहा, निरोगी राहा!
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Property Tax: प्रॉपर्टी टॅक्स चुकवणाऱ्यांना BMCचा दणका! मालमत्ता होणार जप्त, ६०० कोटींची थकबाकी वसूल करणार

SSC HSC Exam : मोठी बातमी! बारावीची ११ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Kolhapur School Incident: शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू! कोल्हापुरात घडली हृदयद्रावक घटना

Ambernath Crime: आईच बनली वैरीण! नवजात बाळाला 17 व्या मजल्यावरुन फेकले, हृदय पिळवटून टाकणारी घटना

पुन्हा चालणार सलमान - करिश्माची जादू; मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होणार 'बीवी नंबर 1'

SCROLL FOR NEXT