हेल्दी फूड : फायदे प्रथिनयुक्त आहाराचे.... sakal media
myfa

हेल्दी फूड : फायदे प्रथिनयुक्त आहाराचे....

कार्बोहायड्रेट्स आणि फॅटच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल अनेक वाद आहेत

शौमा मेनन

कार्बोहायड्रेट्स आणि फॅटच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल अनेक वाद आहेत. मात्र, प्रथिनांच्या महत्त्वाबद्दल सर्वच जण सहमती दर्शवतात. अनेक सर्वेक्षणांतून हे सिद्ध झाले आहे, की अधिक प्रमाणात प्रोटिन असलेला डाएट घेतल्यास वजन कमी करण्यात आणि चयापचय सुधारण्यात उपयोग होतो.

भूक लागण्याचे प्रमाण कमी होते : फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने हे तीन मायक्रोन्युट्रियनट्स तुमच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. याचे एक कारण प्रथिने तुमच्या शरीरातील ‘घ्रेलिन’ नावाच्या भूकेच्या हार्मोनची पातळी कमी करते. त्याचबरोबर पचन करणाऱ्या ‘वायवाय’ या होर्मोनची पातळी उंचावते. यामुळे तुम्हाला कायम पोट भरल्यासारखे वाटते. याचे पचनशक्तीवरील परिणाम खूप मोठे असतात. एका अभ्यासानुसार, एका महिलेच्या शरीरातील प्रथिनांचे प्रमाण १५ वरुन ३० टक्क्यांपर्यंत नेल्यावर तिचे कॅलरी घेण्याचे प्रमाण ४४१ने कमी झाल्याने दिसून आले

स्नायूंचे वजन आणि ताकद : प्रथिने तुमच्या स्नायूंच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यामुळे तुम्ही व्यायाम करीत असताना योग्य प्रमाणात प्रथिने घेतल्यास तुमच्या स्नायूंचे वजन आणि ताकद कायम राहाते.

हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम : असा गैरसमज पसरवला जातो, की प्रथिने व त्यातल्या त्यात प्राणिजन्य प्रथिने तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी योग्य नाहीत. तुमच्या शरीरातील आम्लांचे प्रमाण वाढते, हे त्यासाठीचे कारण दिले जाते. मात्र, प्रथिनांमुळे कॅल्शिअमचे प्रमाण योग्य राखले जाऊन हाडे बळकट होतात.

खाण्याची तल्लफ आणि रात्री उशिरा खाणे कमी होते : अन्नाची लालसा ही सामान्य भूकेपेक्षा वेगळी असते. यामध्ये तुमच्या शरीराला कोणत्याही ऊर्जेची किंवा पौष्टिक आहाराची गरज नसते, तर ती केवळ तुमच्या मेंदूची गरज असते.

चयापचय शक्ती वाढून फॅट्सचे ज्वलन वाढते : खाल्ल्यामुळे तुमचे चयापचय काही काळासाठीच वाढते. याचे कारणे तुमचे शरीर अन्न पचवण्यासाठी कॅलरिजचा उपयोग करते व अन्नातील पौष्टिक घटकांचा त्यासाठी उपयोग करते. याला थर्मिक इफेक्ट ऑफ फूड (टीईएफ) असे म्हणतात. मात्र, सर्वच पदार्थांचा ‘टीईएफ’ सारखा नसतो. प्रथिनांचा टीईएफ २० ते ३५, तर फॅट आणि कार्बोहायड्रेट्सचा केवळ ५ ते १५ असतो.

रक्तदाब कमी होतो : हृदविकार, स्ट्रोक, किडनीसंबंधीच्या आजारांमागचे प्रमुख कारण उच्च रक्तदाब हेच असते. अधिक प्रमाणात प्रथिने घेतल्यास रक्तदाब कमी होत असल्याचे आढळले आहे.

कमी केलेले वजन कायम राहते : अधिक प्रथिने असलेला आहार घेतल्याने चयापचय सुधारते व अन्नाची लालसा कमी होते. त्यामुळे प्रथिने अधिक आहार घ्यायला सुरवात करताच अनेकांमध्ये वजन कमी होत असल्याचे व कमी झालेले वजन कायम राहात असल्याचे दिसते.

किडनीवर दुष्परिणाम होत नाहीत : अधिक प्रथिने असलेल्या आहाराने किडनीवर दुष्परिणाम होतात असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, आधीच किडनीसंबंधीत आजार असलेल्या व्यक्तींनी प्रथिनांचे प्रमाण कमी केल्यास त्यांना फायदा होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रथिनांचे प्रमाण ठरवावे.

दुखापती बऱ्या होण्यास मदत : एखादी गंभीर दुखापत बरी होण्यासाठी प्रथिनांचा उपयोग होतो. प्रथिने तुमचे टिश्‍यू (उती) व अवयवांचे बिल्डिंग ब्लॉक असल्याने हा उपयोग होतो.

वाढत्या वयात फिटनेस कायम राहातो : वाढत्या वयाबरोबर तुमचे स्नायू कमकुवत होत जातात. त्यातून सारकोपेनिया हा वृद्धांत आढळणारा आजार बळावतो. त्यातून हाड मोडण्यासारखे प्रकार घडतात आणि वृद्धांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. हे वाचून तुम्ही तुमच्या रोजच्या आहारातील प्रमाण योग्य राखाल, हीच अपेक्षा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

Accident: खोपोलीजवळ बस अन् टेम्पोचा मोठा अपघात, ९ जण जखमी

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या, आज तीन तासांचा ब्लॉक!

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

SCROLL FOR NEXT