yogurja 
myfa

Video : योगाबरोबर जीवनशैली बदलाचीही गरज

देवयानी एम.

योग ‘ऊर्जा’
Everyone in the world knows me, but I’m misunderstood – Yoga
मध्यंतरी मला साधारण ८० वर्षांचे एक गृहस्थ भेटले. त्यांना मी योग शिकवते समजल्यावर मला विचारलं, ‘‘ते हठयोग म्हणजे पाण्यावर चालतात तेच का?’’ मला माझ्या कानांवर विश्वास ठेवायला दोन क्षण लागले. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की, हठयोग म्हणजे काय, योगाचे आपल्यावर काय परिणाम होतात, सिद्धी म्हणजे काय वगैरे. पण त्यांच्यामध्ये उत्सुकता आणि संयम दोन्हीही नव्हतं. त्यांना फक्त पाण्यावर चालणारं कुणीतरी मला माहीत आहे का, इतकंच जाणून घ्यायचं होतं. योग म्हणजे चमत्कार किंवा अद्‍भुत काहीतरी अशी काहीशी अवास्तव समजूत असावी त्यांची! असंच काहीसं होतं, आपण झटपट आणि डोळ्यांना दिसणारी गोष्ट देऊ शकत नाही.

योगाबद्दलचे गैरसमज
  योग म्हणजे फक्त स्ट्रेचिंग.
  योग हा वयस्कर लोकांनी करण्याचा आहे.
  शवासन म्हणजे झोपणं.

  योगासनांनी खरा व्यायाम होत नाही. प्राणायाम करताना कंटाळा येतो.

अशा गोष्टी ऐकायला येतात. पण तो अर्धा किंवा एक तास आपण स्वतःबरोबर असतो... आसनं करताना, श्वासावर लक्ष ठेवताना, शवासनात.. अशा वेळी आपल्याला कंटाळा येत असल्यास आपणच कंटाळवाणे आहोत असं म्हणायला पाहिजे.

आपल्याला आपलाच सहवास आवडत नाही. पुढच्या वेळी आसनस्थितीमध्ये असाल, तेव्हा त्या आसनाच्या अवस्थेमध्ये पूर्ण एकरूप होऊन जा.  प्राणायाम कराल, तेव्हा पूर्ण फुफ्फुसं भरून श्वास घेण्याइतकी सहज क्रिया आपल्याला किती शांत करू शकते ते समजेल. मग हळूहळू गोडी निर्माण होईल. भाकरी चावून चावून खाण्याने गोड लागते.. तशीच! सर्वसाधारणपणे योग शिकायला स्त्रियांचा सहभाग अधिक असतो. योगासनात खरा व्यायाम होत नाही, असं वाटणाऱ्यांनी किमान एक महिना तरी प्रयत्न करावा. मला खात्री आहे की सर्व गैरसमज दूर होतील. 

योगाबरोबर जीवनशैली बदलाचीही गरज
अनेक भारतीय आणि हॉलिवूडचे अभिनेते, अनेक अभिनेत्री, नामवंत खेळाडू, वर्ल्ड चॅम्पिअनस् योगातून शारीरिक-मानसिक स्वास्थ्य मिळवत आहेत. माझ्या स्टुडिओमध्ये तरुण आणि पुरुष व महिला क्लायंट येतात, तेव्हा मला समाजात होत चाललेला बदल पाहून आनंद होतो. बहुतांश लोक पाठ-मानेचे त्रास सुरू झाल्यावर योगाकडे वळतात, पण तोपर्यंत नुकसान झालेलं असतं किंवा ते सुरू झालेलं असतं. आपण प्रवासात गाडी बंद पडल्यावर दुरुस्त करण्यापेक्षा नियमितपणे आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स करतो. तसंच आपल्याला शरीराचे का नाही करावासं वाटत? मला अनेक जण विचारतात की, योगानं वजन कमी होईल का? मी त्यांना सांगते दिवसातील एक तास तुम्ही माझं ऐकलं, पण बाकीचे २३ तास नाही ऐकलंत तर कसं होईल? म्हणजे फक्त योगानं वजन कमी करून द्यावं आणि स्वत: काहीच करणार नाही! आठवड्यातील फक्त तीन ते सहा तास योगाने अनुशासित जीवन जगणार व उरलेले १६२ ते १६५ तास अनियंत्रित मुक्त जीवन जगणार. योगाला बदनाम करणार! या उलट शिस्तबद्ध राहून नियमित योगवर्गाबरोबरच जीवनशैलीही बदलतात त्यांच्यात आमूलाग्र बदल पाहायला मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Property Tax: प्रॉपर्टी टॅक्स चुकवणाऱ्यांना BMCचा दणका! मालमत्ता होणार जप्त, ६०० कोटींची थकबाकी वसूल करणार

SSC HSC Exam : मोठी बातमी! बारावीची ११ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Kolhapur School Incident: शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू! कोल्हापुरात घडली हृदयद्रावक घटना

Ambernath Crime: आईच बनली वैरीण! नवजात बाळाला 17 व्या मजल्यावरुन फेकले, हृदय पिळवटून टाकणारी घटना

पुन्हा चालणार सलमान - करिश्माची जादू; मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होणार 'बीवी नंबर 1'

SCROLL FOR NEXT