Devyani M 
myfa

पचनक्रियेतील विकार : बद्धकोष्ठता 

देवयानी एम

आपण मागील दोन लेखांपासून पचनसंस्थेविषयी जाणून घेत आहोत. पचनक्रिया, जेवणासंबंधीच्या सवयी आणि संपूर्ण पचनकार्याला सुरळीत सुरू ठेवण्यासाठी योगातील विविध शुद्धिक्रिया, आसने, प्राणायाम आणि शिथिलीकरणाचा उपयोगही समजून घेतला. आपण आज अशा एका विषयावर बोलू जो इतक्या प्रमाणात सर्वसामान्यपणे लोकांमध्ये आढळतो की तो विकार आहे, हेही आता वाटेनासे झाले आहे, तो म्हणजे बद्धकोष्ठता! 

बद्धकोष्ठता हा विकार लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये आढळतो. बद्धकोष्ठता म्हणजे मोठ्या आतड्यातील जमलेला मल नैसर्गिकरीत्या बाहेर पडण्याच्या प्रक्रियेची कार्यक्षमता कमी होणे. अशाने ही घाण वाढत जाऊन मोठ्या आतड्यात सडू लागते. हे दीर्घकाळ होत गेल्याने तीच घाण पुन्हा रक्तात शोषली जाऊन शरीरभर पसरते आणि आपल्या शरीरात विषारी द्रव्ये वाढू लागतात. 

बद्धकोष्ठतेची लक्षणे 
१. आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा शौचास लागणे. 
२. कडक स्वरूपाचा मल. 
३. शौचाच्यावेळी खूप जोर लावावा लागणे. 
४. पोट नीट साफ न होणे. 
५. पोटात दुखणे. 
६. जड वाटणे, भूक मंदावणे. 

बद्धकोष्ठतेमुळे होणारे त्रास – 
१. गुदाशयात रक्तस्राव (rectal bleeding) 
२. फिशर (fissure) 
३. मूळव्याध (piles) 
४. डोकेदुखी, चिडचिडेपणा (headache, irritation) 
५. तोंडाला दुर्गंधी (bad breath) 
६. जडपणा, निरसता (heaviness, dullness) 

बद्धकोष्ठतेची कारणे – 
१. जंक फूड (high fat, processed, packaged food) 
२. अन्नात फायबरचे प्रमाण कमी असणे (low fiber food) 
३. पाणी कमी पिणे (dehydration) 
४. व्यायाम न करणे, एका जागी दीर्घकाळ बसणे (inactivity) 
५. शौचास लागून सुद्धा काही कारणाने न जाणे (resisting the urge) 
६. अति प्रवास, शिफ्टमध्ये काम, जेवणा-झोपण्याच्या वेळा न सांभाळणे (erratic lifestyle) 
७. ताणतणाव, मानसिक अडथळे (stress) 
८. तंबाखू, दारूचे सेवन (tobacco, alcohol) 
९. गरोदरपणा (pregnancy) 
१०. वृद्धापकाळ (old age) 

बद्धकोष्ठतेवर उपाय – 

१. दिवसभरात तीन ते चार लीटर पाणी पिणे. 
२. जेवणा-झोपण्याच्या वेळा सांभाळणे. 
३. आहारात पालेभाज्या, फळभाज्या, फळे असे फायबरयुक्त अन्न असावे. सकस-पौष्टिक आहार असावा. 
४. जंक फूड खाणे टाळावे, रूक्ष आहार टाळावा. 
५. चहा-कॉफीचं अतिसेवन टाळावे. 
६. आहारात तूप रोज असावे.७. डायटिंगच्या नावाखाली तेल पूर्ण बंद करू नये. 
८. नियमित व्यायाम करावा (चालणे, धावणे, सूर्यनमस्कार इत्यादी) 
९. बैठे काम असलेल्यांनी रोज व्यायाम करावा. 
१०. शौचास बसण्याची योग्य पद्धत असावी (कमोडचा वापर असल्यास पायाखाली स्टूल घेणे) 
११. ताणतणाव कमी करण्यासाठी व शारीरिक-मानसिक-प्राणिक शक्तीला चालना देऊन समतोल राखण्यासाठी नियमित शुद्धिक्रिया, योगासने, प्राणायाम, योग्य शिथिलीकरण, ध्यान करणे हे अत्यावश्यक आहे. 

प्रत्येकाने आपापली क्षमता व वयोगटानुसार खाली दिलेल्या आसन, प्राणायाम व शुद्धीक्रियांचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव करावा. 

आसने - पवनमुक्तासन, त्रिकोणासन, वज्रासन, ताडासन, कटिचक्रासन, भुजंगासन, अर्धमत्स्येंद्रासन, नौकासन, धनुरासन, भद्रासन, पर्वतासन, वक्रासन, उष्ट्रासन, मंडुकासन, उत्तानमंडुकासन, कागासन, पश्चिमोत्तानासन, शलभासन, सूर्यनमस्कार इ. 

प्राणायाम - उज्जयी, भस्त्रिका, अनुलोम-विलोम, भ्रामरी 

शुद्धिक्रिया - कपालभाती, अग्निसार, शंखप्रक्षालन, लघुशंखप्रक्षालन, नौली, बस्ती 

मुद्रा-बंध - अश्विनी मुद्रा, उड्डीयान बंध 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam : मोठी बातमी! बारावीची ११ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Kolhapur School Incident: शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू! कोल्हापुरात घडली हृदयद्रावक घटना

Ambernath Crime: आईच बनली वैरीण! नवजात बाळाला 17 व्या मजल्यावरुन फेकले, हृदय पिळवटून टाकणारी घटना

पुन्हा चालणार सलमान - करिश्माची जादू; मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होणार 'बीवी नंबर 1'

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निकालापूर्वीच घडामोडींना वेग; नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT