शोध स्वतःचा : एकटेपणा... sakal News
myfa

शोध स्वतःचा : एकटेपणा...

एकटेपणा म्हणजे स्वत्वाचा अभाव. जितकं तुमचं स्वतःबरोबरचं नातं घट्ट होईल तितकं तुम्हाला कमी एकटं वाटू लागेल. कारण आपण विसरतो, की एकटेपणात पण आपल्याला स्वतःची साथ असतेच ना

देवयानी एम.

आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. काहींना अनेक मित्र मैत्रिणी तर काहींना मोजके, काहींच्या घरात खूप माणसं, तर काही अगदी न्यूक्लिअर फॅमिली, काही अगदी सोशल तर इतर जास्त मिक्स न होणारे, काही बहिर्मुख तर काही अंतर्मुख... पण प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी एकटेपणा येतोच. काही एकांतात एकटे तर काही गर्दीतही एकटे!

एकटेपणा म्हणजे कोणाशीही कनेक्टेड न वाटणं. आपल्या आजूबाजूच्यांशी एक प्रकारचा कारण नसताना वाटत असणारा दुरावा. काही कारणास्तव आलेला दुरावा सोडवून मिटवता येतो, पण अकारण कोणाशीही कनेक्टेड न वाटणं म्हणजे कोणाची साथ न वाटणं, मला कोणी समजू शकत नाही असं वाटणं. माझ्या मागच्या मंगळवारच्या लेखात आपण जे ‘रेड फ्लॅग’ बघितलं, त्यात एकटेपणा हाही एक रेड फ्लॅग आहे. काहीतरी बदलायची गरज आहे असं समजावं.

नात्यांमध्ये अर्थपूर्णता (meaningful relationships) असणं फार महत्त्वाचं आहे. जगातील ब्लू झोन्समध्ये सर्वांत दीर्घायुषी आणि आनंदी माणसं राहतात, त्यांनी (चांगल्या सवयींबरोबरच) अर्थपूर्ण नात्यांच्या बळावर आपलं शतायुषी आयुष्य टिकवून ठेवलं आहे. इंग्रजीमध्ये सेन्स ऑफ बिलॉंगिंग म्हणतात तसं समाजात, आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर आपलेपणाची भावना वाटणं, निरोगी सोशल लाइफ असणं हे आनंदी राहण्यासाठीचा महत्त्वाचा आणि गरजेचा भाग आहे. आजकाल आपण खूप वेळ इंटरनेटवर घालवतो, प्रत्यक्ष एकमेकांबरोबर नाही. एकमेकांबरोबर कनेक्टेड कमी राहतो आणि ऑनलाइन जास्त असतो. इतरांकडं काय आहे आणि आपल्याकडं काय नाही याची तुलना सतत करतो, जरा थोडा वेळ मिळाला की हातात फोन घेतो, आयुष्य वर वर जगतो अशानं न्यूनगंड वाढतो, लाईक आणि फॉलोच्या खेळात स्वतःला हरवून बसतो.

Loneliness is the poverty of Self

एकटेपणा म्हणजे स्वत्वाचा अभाव. जितकं तुमचं स्वतःबरोबरचं नातं घट्ट होईल तितकं तुम्हाला कमी एकटं वाटू लागेल. कारण आपण विसरतो, की एकटेपणात पण आपल्याला स्वतःची साथ असतेच ना. स्वतःपासून हरवलेला माणूस कोणाशीही जोडला जाऊ शकत नाही. जितकी तुमची आतली पकड मजबूत तितकी इतर गोष्टींवर पकड येत जाईल. सेन्स ऑफ बिलॉंगिंग यायला आपण बिलॉंग कुठे करतो किंवा करायला पाहिजे, हे आधी स्पष्ट कळायला पाहिजे. आजपासून जेव्हा जेव्हा थोडा वेळ मिळेल, तेव्हा हातात फोन न घेता खिडकीच्या बाहेर बघा. झाडे, पक्षी, प्राणी, आकाश, निसर्गाची जोडले जा. आपण या निसर्गातून तयार झालो आहोत त्याच्याशी पहिले जोडण्याचा प्रयत्न करू या.

Loneliness is lack of Purpose

एकटेपणा हा आजूबाजूला असलेल्या माणसांचा अभाव नसून, निरुद्देश आणि लक्ष्यहीनतेतून जन्माला येतो. काही वर्षांपूर्वी मी माझ्या आईला विचारलं होतं, ‘तुला कधी एकटं नाही का वाटत?’ त्यावर ती म्हणाली, ‘मला ग्रंथांची आणि संतांची सतत साथ वाटते.’ आपण आयुष्यात रोल मॉडेल इतके उंचीचे ठेवले पाहिजेत, की जवळ कोणीही नसलं तरी त्या उच्च पातळीवर जगलेल्या थोर पुरुषांच्या विचारांची साथ वाटली पाहिजे आणि मग कात टाकून नवी उमेद आली पाहिजे. ‘low’ वाटणं नैसर्गिक आहे. पण त्यात आपण गुंतून किती वेळ राहायचं हे महत्त्वाचं. आजपासून वेळ मिळाल्यावर टीव्ही किंवा फोन हातात न घेता पुस्तक वाचा. वेळ करमणुकीने न भरता आत्मविकासाचा विचार ठेवा.

कित्येकदा कठीण काळ एकटेपणा आणतो. पण हाच कठीण काळ नवनिर्मिती होण्यासाठीचा संक्रमणाचा काळ ठरू शकतो. अंड्यातून बाहेर येताना पिलांना काय कमी त्रास होतो! तिथं तर त्याला त्याची आई काय कोणीच मदत करू शकत नाही. त्याचं त्यालाच बळकट व्हावं लागतं. किंबहुना अंडं फोडून बाहेर येण्याचीच प्रक्रिया त्याला पुढच्या आयुष्यासाठी सक्षम आणि तयार करत असते. काही पावलं आपल्याला एकट्यानं चालावी लागू शकतात पण आपल्याला आपली स्वतःची साथ आहे हे विसरू नका.

विचार करा या क्षणाला कितीतरी लोक त्यांच्या आयुष्याचे शेवटचे श्वास मोजत असतील आणि ते देवाकडं जगण्याची एक संधी मागत असतील, जी आपल्याकडे आहे- ती वाया घालवू नका!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT