Nagpur Accident ESAKAL
Nagpur_old

Nagpur Accident : नागपूर हादरलं! तलावात बुडून पाच तरुणांना जलसमाधी; मोहगाव झिल्पी येथील घटना

सकाळ डिजिटल टीम

Hingna/Nagpur News : मित्रांसोबत मोहगाव झिल्पी तलाव परिसरात फिरायला गेलेल्या ८ पैकी पाच तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना रविवारी (ता.२) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.

रविवारी रात्री आठ वाजता पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. सदर पाचही युवक हे नागपुरातील पारडी आणि वाठोडा येथील रहिवासी आहेत.

ऋषिकेश अनिल पराळे (वय २१, रा. वाठोडा), राहुल अरुण मेश्राम (वय २१, रा. गिड्डोबा मंदिर चौक, वाठोडा), नितीन नारायण कुंभारे (वय २१), शंतनू अरमरकर (वय २३) आणि वैभव वैद्य (सर्व रा.भांडेवाडी, पारडी) अशी मृतांची नावे आहेत.

तर दुसऱ्या घटनेत पेंचमध्ये बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. शनिवारी समृद्धी महामार्गावरील ट्रॅव्हलच्या दुर्घटनेनंतर रविवारी जलसमाधीच्या दोन्ही घटनांनी नागपूरकर हादरून गेले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुटी असल्याने ऋषीकेश हा मित्रांसह मोहगाव झिल्पी परिसरात आला होता. सुरुवातीला काही काळ सर्वजण तलाव परिसरात फिरले. मोबाइलद्वारे छायाचित्रे काढली.

तो डॉ. प्राजक्त मोरेश्वर लेंडे (वय ३२, रमना मारोती चौक) यांच्या कारवर चालक होता. डॉ. प्राजक्तने ऋषीकेशला फोन केला तेव्हा मित्रांसोबत तलावावर फिरायला आलो आहे. तुम्ही पण या, असे त्याने सांगितले.

यामुळे डॉ. प्राजक्त आणि वैभव वैद्य कारने तिथे पोहोचले. डॉ. प्राजक्त कारजवळ थांबले होते. काही वेळाने उर्वरित चार जण पोहण्यासाठी तलावात उतरले.

खोल पाण्यात गेल्याने सर्व जण गटांगळ्या खाऊ लागले. तेव्हा काठावर असलेले दोघे जण मदतीला गेले. मात्र ते सुद्धा बुडाले. इकडे डॉ. प्राजक्त मदतीला पोहोचेपर्यंत पाचही जण बुडाले होते.

त्यांनी याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. दरम्यान उर्वरित तिघांनीही आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील नागरिक धावले.

पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अनुराग जैन, हिंगणा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्यासह पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला.

स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

पेंचनदी पात्रात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

पारशिवनी ः मित्रांसोबत फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांचा पेंच नदीतील घोगरा परिसरात बुडून मृत्यू झाला. आलोक अमोल नेवारे (२१ बाबानगर शाळेमागे, मोचीपुरा नंदनवन, नागपूर ) असे मृताचे नाव आहे.

आलोक व त्याचे आठ मित्र सकाळी ७ वाजता नागपूरवरून पारशिवनी तालुक्यातील पेंच नदीतील श्री क्षेत्र घोगरा महादेव येथे आले. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते आंघोळीकरिता मंदिर परिसरापासून ३०० मीटर अंतरावरील नदीतील चिखली डोहाजवळ आले. यावेळी काही मित्रांनी नदीच्या किनाऱ्यावर आंघोळी केल्या.

पोहण्यासाठी आलोक पाण्यात उतरला आणि पोहत तो दूर जाऊ लागला. काही वेळातच तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.

तो दूरवर असल्यामुळे कुणीही त्याला वाचवू शकले नाही. घटनेची माहिती पारशिवनी पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे, उपनिरीक्षक शिवाजी मुंढे व महसूल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले .

स्थानिक नावाड्यांच्या मदतीने दुपारी मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पुढील तपास पारशिवनी पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT