ganja esakal
Nagpur_old

नागपूर : गांजा प्रकरणी दोन कर्मचारी निलंबित

१० पर्यंत पोलिस कोठडी ः पोलिस आयुक्तांनी घेतली दखल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात खापरखेड्यातील कुख्यात गुंड आणि मोक्काचा न्यायबंदी सूरज कावळे (२२) जवळ ५१ ग्रॅम गांजा आणि १५ मोबाईल बॅटऱ्या आढळल्या. या प्रकरणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले. दोन्ही कर्मचारी पोलिस मुख्यालयातील आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सुरेश कावळे हा कुख्यात गुन्हेगार असून तो मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदिस्त आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सोबतच अटकेतील पोलिस उपनिरीक्षक प्रदीप नितवणे हा कारागृहात सुरेश कावळेच्या बराकमध्ये सोबत आहे. त्यामुळे दोघांची मैत्री झाली. कारागृहातील कैद्यासाठी सुरेशने आपला भाऊ शुभम कावळे याला गांजा आणि मोबाईलच्या बॅटरी पाठविण्यास सांगितले. शुभमने आपले टोळ्यातील साथीदार सूरज वाघमारे, भागीरथ खरदयाल, अथर्व खटाखटी, मोरेश्वर सोनोने आणि

गांजा प्रकरणी दोन कर्मचारी निलंबित

बाबू पंजाब नायडू यांच्या मदतीने कारागृहात आरोपपत्राच्या फाईलमध्ये ५१ ग्रँम गांजा आणि १५ मोबाईल बँटरी पोहचविण्याची व्यवस्था केली. मात्र, त्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी ती फाइल जप्त केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली.

सोमवारी कारागृहात झडतीदरम्यान रक्षकाला संशय आल्याने कागदपत्रांचे फोल्डर तपासले असता प्रचंड खळबळ उडाली. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी सूरजसह सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. धंतोली पोलिसांनी मंगळवारी सूरजला प्रॉडक्शन वारंटवर ताब्यात घेतले आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

बलात्काराच्या प्रकरणात अटक असलेला पोलिस उपनिरीक्षक प्रदीप नितवणे कारागृहात आहे. प्रदीपला मित्र-मैत्रिणीसोबत बोलायला मोबाईल पाहिजे होता. त्याने आपल्या नातेवाइकांना ४५ हजार रुपये शुभम कावरेच्या खात्यात टाकायला सांगितले. पैसे मिळताच शुभमने काही पोलिस कर्मचाऱ्यांना ‘सेट’ केले. त्यानुसार १५ बँटरी आणि गांजा कारागृहात पोहचविण्यात येत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT