100 students had to return home bus got stuck in pit another school bus got stuck on road Sakal
नांदेड

Nanded : १०० विद्यार्थ्यी शाळेत न जाता घरी परतले; काय घडले वाचा...

सकाळ वृत्तसेवा

मारतळा‌ : कांजाळा ते‌ काकांडी मार्गावरील अरुंद व खड्डेमय रस्त्याच्या कडेला असलेल्या ‌चिखलात मानव विकास मिशनची बस फसली. याचवेळी अन्य एका खासगी शाळेचीही बस रस्त्यात अडकल्याने सोमवारी (ता.२२) दोन्ही बसमधील १०० विद्यार्थ्यांना शाळेऐवजी घरी परतावे लागले.

लोहा तालुक्यातील कापसी बुद्रुक येथील श्री संत बाळगीर महाराज हायस्कूलमधील विद्यार्थिनींना शाळेत ने-आण करण्यासाठी मानव विकासची बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या बसने डोलारा, कांजाळा‌, कांजाळा तांडे, शंभरगाव‌ या गावातील जवळपास‌ ५० विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे या बसने सोमवारी (ता.२२) शाळेत निघाल्या.

दरम्यान, ही बस कांजाळा ते‌ शंभरगाव‌ रस्त्यावरील खड्डे चुकविताना‌ रस्त्याच्या कडेला चिखलात फसली. या अरुंद रस्त्यातच‌ शिवशक्ती माध्यमिक विद्यालय काकांडी या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी‌ खासगी‌ बसही‌ (एम‌एच‌-२६, एन‌-९३३९) मध्येच अडकली. त्यामुळे या दोन्ही बसमधील १०० विद्यार्थ्यांना शाळेऐवजी घराचा रस्ता पकडावा लागला. यामुळे एक दिवसाचे अध्ययन घेता आले नाही.‌

वेळीच दुरुस्ती केली असती तर

लोहा तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती केली असती तर गैरसोय झाली नसती अशा प्रतिक्रिया यावेळी पालकांनी व्यक्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT