किनवट : तालुक्यातील अनुसूचित क्षेत्र (पेसातील ) १०२ ग्रामपंचायती अनुसूचित जमाती (एसटी) व एसटी महिला यांच्यासाठी प्रत्येकी ५१- ५१ ग्रामपंचायती, बिगर अनुसूचित क्षेत्रातील ३२ ग्रामपंचायतीतून अनुसूचित जाती एक, अनुसूचित जाती (महिला) दोन, अनुसूचित जमाती (महिला) एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग चार, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ५, सर्वसाधारण (खुला) ९, सर्वसाधारण महिला १० अशा एकूण ६९ महिलांसाठी २०२०- २०२५ या कालावधीकरिता सरपंच पदाचं आरक्षण सुटलं असल्याची माहिती तहसीलदार उत्तम कागणे यांनी दिली.
तालुक्यातील एकूण १३४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी (ता. १९) तहसील कार्यालयात श्रावणी संदीप पाटील या बालिकेच्या हस्ते काढण्यात आली. तालुक्यात अनुसूचित क्षेत्र (पेसा) अंतर्गत एकूण १०२ ग्राम पंचायती आहेत. यापैकी ५१ ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्ग) करिता, तर ५१ ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्ग) महिलांकरिता आरक्षित करण्यात आल्या.
हेही वाचा - नांदेड : १३०९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, ५० टक्के महिलांच्या हाती गावांची दोरी -
उर्वरित बिगर अनुसूचित क्षेत्र (पेसा) तील ३२ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत पुढील प्रमाणे :
अनुसूचित जाती (एस.सी प्रवर्ग) १ : चिखली (ई); अनुसूचित जाती (एस.सी प्रवर्ग ) महिला २ : इस्लापूर व रिठा; अनुसूचित जमाती ( एस.टी. प्रवर्ग ) महिला १ : ईरेगाव; नागरिकांचा मागास प्रवर्ग ४ : गोंडेमहागाव, मानसिंग नाईक तांडा, मरकागुडा व मुळझरा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ५ : अंबाडी तांडा, भिसी, नंदगाव, नंदगाव तांडा व मारलागुंडा, सर्वसाधारण (खुला) ९ : मलकजाम तांडा, कंचली ( ई ), तोटंबा, गोंडजेवली, पांगरी, अप्पारावपेठ, मोहाडा, फुलेनगर व रोडानाईक तांडा, सर्वसाधारण (खुला) महिला १०: आंदबोरी (ई), वाळकी (बु ), कोसमेट, जरूरतांडा, पांगरपहाड, दिपलानाईक तांडा, शिवणी, दयालधानोरा, बुधवारपेठ व मलकजाम. या प्रसंगी नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम, महम्मद रफीक, श्रीमती कोलगणे, निवडणूक विभागाचे नितीन शिंदे व अशोक कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अनुसूचित क्षेत्र (पेसा) मधील अनुसूचित जमाती मधील (एसटी प्रवर्ग )५१ आरक्षित ग्राम पंचायतींची नावे पुढीलप्रमाणे : आंजी, बोधडी (बु), बोथ, भूलजा, भंडारवाडी, चिंचखेड, चिखली (बु), चिखली (खु), दिग्रस / चंद्रपूर, दरसांगवी (सि), दाभाडी, धानोरा ( सी ),धामनदरी, डोंगरगाव (चि), गौरी, जरूर, कोल्हारी, मारेगाव (व), मारेगाव (खा), मलकापूर / खेरडा, माळकोल्हारी, नागापूर, नागझरी, निराळा, निराळा तांडा, पिंपळगाव (सि ), पारडी (खु), परोटी, पिंपरी, पिंपरफोडी, पांधरा, प्रधानसांगवी, राजगड तांडा, शिरपूर, सारखणी, कनकवाडी, मलकवाडी, कोपरा, कुपटी ( बु ), कोठारी (सि ), कमठाला, उनकदेव,लिंगी, माळबोरगाव, सक्रूनाईक तांडा, वडोली, यंदा /पेंदा, कोठारी (चि ), सिंदगी ),मो रामपूर/ भामपुर, सालाईगुडा.
येथे क्लिक करा - नांदेड - हर घर, नल से जल योजनेतून गाव तिथे पाणी देणार - वर्षा ठाकूर-घुगे -
अनुसूचित क्षेत्र (पेसा) मधील अनुसूचित जमातीमधील (एसटी प्रवर्ग) ५१ महिला आरक्षित ग्राम पंचायतींची नावे पुढीलप्रमाणे : सावरी, मदनापूर (चि), आंदबोरी (चि), दहेली तांडा, देवला नाईक तांडा, बेंदी तांडा, परसराम नाईक तांडा, मोहपूर,पळशी, बेल्लोरी (धा), शनिवारपेठ, दुन्ड्रा, बेंदी, बोधडी (खु), दरसांगवी (चि), कनकी, सिंगोडा, दिगडी(मं), उमरी (बा), दहेली, राजगड, मांडवा, निचपूर, पाटोदा (खू), तल्हारी, पार्डी (सि), घोटी, दहेगाव, खंबाळा, पिंपळशेंडा, कुपटी (खु), पाथरी, आमडी, मांडवी, पाटोदा (बु),वझरा (बु), घोगरवाडी, करंजी(ई), लोणी, थारा, सिंगारवाडी, अंबाडी, भिमपूर, पिंपळगाव (कि ), टेंभी, जवरला, जलधारा, सावरगाव तांडा, बेल्लोरी(ज), भिलगाव, गोकुंदा.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.