नांदेड : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ९० टक्के अनुदानावर नऊ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर, त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याच्या योजनेंतर्गत एकूण १५३ बचतगट पात्र झाले आहेत. ईश्वर चिठ्ठीने पात्र बचत गटांपैकीच निवड होणार असल्यामुळे सोडतीची वेळ आणि तारीख लवकर कळविण्यात येणार आहे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
९० टक्के अनुदानावर नऊ ते १८ एचपीचे मिनी ट्रॅक्टर
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ९० टक्के अनुदानावर नऊ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. शासन निर्णय ता. आठ मार्च २०१७ अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
हेही वाचा....नांदेड बाजारात भुईमुगाची आवक सुरू
१५३ बचत गटांनी केली त्रुटीची पूर्तता
सन २०१८ - १९ या वर्षात ज्या बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्या सर्व अर्जांची तपासणी केली असता अर्जात त्रुटी आढळून आल्या असून एकूण १५३ बचत गटांनी त्रुटीची पूर्तता केली आहे. पात्र व अपात्र बचतगटांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर दर्शनी ठिकाणी लावण्यात आली आहे.
हेही वाचलेच पाहिजे.... काजव्यांच्या प्रकाशात पाहिलं सुगरणीचं घरटं...!
चार वेळा देण्यात आली संधी
अर्ज केलेल्या सर्व बचत गटांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी यापूर्वीच चार वेळा संधी देण्यात आली होती. पहिली संधी ता. १० जुलै २०१९ पर्यंत तर दुसरी ता. १२ डिसेंबर २०१९ पर्यंत व तिसरी संधी ता. ३० डिसेंबर २०१९ पर्यंत आणि चौथी संधी ता. १४ फेब्रुवारी २०२० पर्यंत देण्यात आली होती.
शहर व परिसरातील काही भागाचा वीजपुरवठा बंद
महावितरण व महापारेषणकडून पावसाळापुर्व करावयाच्या देखभाल दुरूस्तीसाठी गुरुवारी (ता. २०) नांदेड शहरातील काही परिसराचा वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. वीजग्राहकांनी याची नोंद घेवून वीजपुरवठा बंद असलेल्या काळात सहकार्य करावे असे अवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरूवारी नांदेड शहरातला वीजपुरवठा राहणार बंद
पावसाळयातील वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडीत होवू नये यासाठी महावितरण व महापारेषण कंपनीच्या वतीने पावसाळयापुर्व देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेतली जातात. त्यामुळे गुरूवारी (ता. २१) नांदेड शहराला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ केव्ही जंगमवाडी उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या ११ केव्ही विद्युत भवन वीजवाहिनीवरील नवामोंढा, दत्तनगर, सांगवी, विमानतळ परिसर, एमजीएम परिसर तसेच ११ केव्ही आनंद नगर, पोलस कॉलनी, विवेकनगर, गणेशनगर, गजानन मंदीर व पावडेवाडी वीज वाहिनीवरील परिसराचा वीजपुरवठा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहील.
शहराजवळील भाग
१३२ केव्ही इलीचपुर उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या ३३ केव्ही तुप्पा, एसआरटी, कौठा वीज वाहिनीवरील विष्णुपुरी, असर्जन, कौठा, पुणेगाव, काळेश्वर व पांगरा आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहील. १३२ केव्ही जंगमवाडी उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या ३३केव्ही देगाव वीजवाहिनीवरील तेलगाव, देगाव व पिंपळगाव आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत बंद राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.