Lek Ladki Yojana sakal
नांदेड

Lek Ladki Yojana : ‘लेक लाडकी’ला प्रतिसाद ; १६९१ लाभार्थी,७०१ लाभार्थींची ऑनलाइन नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मुलीचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देण्यासाठी ता. एक ऑगस्ट २०१७ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना लागू करण्यात आली होती. त्यानंतर ही योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना लागू करण्याचे राज्य शासनाने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले होते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात लेक लाडकी योजनेला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत एक हजार ६९१ लाभार्थी असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ७०१ लाभार्थींनी आपले अर्ज बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. त्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

‘लेक लाडकी’ ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांत मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येईल. त्याला अनुसरून ता. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केला असून, ही योजना ता. ३० ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने सेविका किंवा अधिकाऱ्यांना हे अर्ज अपलोड करणे बंधनकारक राहणार असून, त्यानंतरच या अर्जदारास या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लेक लाडकी योजनेचे काम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, महिला व बालविकास विभागात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी ताई परिश्रम घेत आहेत. लाभार्थींनी या योजनेसाठी अंगणवाडी ताईंना संपर्क साधत आवश्यक ती कागदपत्रे द्यावीत. आजघडीला एक हजार ६९१ लाभार्थी असून त्यापैकी ७०१ लाभार्थींची ऑनलाइन नोंदणी करण्याचे काम तालुका स्तरावर सुरू आहे.

- रेखा कदम-काळम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद

योजनेच्या अटी-शर्ती

ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये ता. एक एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. या योजनेअंतर्गत अटी, शर्ती व त्यासाठी नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्याआधारे पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांत मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये, सहावीत सात हजार रुपये, अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रशिक्षण पूर्ण

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने तीन हजार ८३४ कर्मचाऱ्यांना या योजनेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका व अंगणवाडी ताईंचा समावेश आहे. ग्रामीण भागात लेक लाडकी योजनेचे लाभार्थी शोधण्याचे काम प्रगतिपथावर असून, हे काम अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT