नांदेड जिल्ह्यास मिळाले २०१ नवीन शिक्षक Sakal
नांदेड

ZP Nanded : जिल्ह्यास मिळाले २०१ नवीन शिक्षक; विषय शिक्षक म्हणून दिल्या नियुक्त्या

जिल्हा परिषदेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी (ता. दहा) पवित्र पोर्टलप्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील २०१ उमेदवारांना बोलाविण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

Nanded News : जिल्हा परिषदेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी (ता. दहा) पवित्र पोर्टलप्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील २०१ उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. त्यानंतर त्यांची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नांदेड, अर्धापूर, मुदखेड, नायगाव तालुके वगळता इतर बारा तालुक्यांत समुपदेशन पद्धतीने नियुक्त्या देण्यात आल्या.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे,

उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, संतोष शेटकार, अधीक्षक महेश लोणीकर, धनंजय गुम्मलवार, श्री. शिंदे, दादाराव शिरसाट यांच्यासह तालुकास्तरावरील सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली.

यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर दिलेल्या पदांच्या जाहिरातीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर मराठी माध्यमाच्या २०२ आणि उर्दू माध्यमाच्या सहा उमेदवारांची गुणवत्ता यादी ता. २५ फेब्रुवारी रोजी शिक्षणाधिकारी यांच्या पवित्र पोर्टल - २०२२ च्या लॉगिनला ऑनलाइन प्राप्त झाली होती.

त्यानुसार जिल्हा परिषदेकरिता विकल्प दिलेल्या पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध गुणवत्ता यादीतील उमेदवारांची सदर यादीतील अनुक्रमांकानुसार ता.२८ फेब्रुवारीनुसार ता. चार ते ता. पाच मार्च या कालावधीत पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व अपलोड केलेल्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर ही समुपदेशन प्रक्रिया रविवारी घेण्यात आली. या समुपदेशन प्रक्रियेत २०१ उमेदवार उपस्थित होते तर सात जण गैरहजर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सात शिक्षक गैरहजर

रविवारी झालेल्या समुपदेशन प्रक्रियेदरम्यान गणित व विज्ञान विषयासाठी ८६, भाषा विषयासाठी ७२, सामाजिक शास्त्रांसाठी ३५, उर्दू विषयासाठी पाच विषय शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली. या नियुक्तीत शंभर टक्के आदिवासी भागातील पेसा कायद्यातंर्गत पदे भरण्यात आली आहे.

नियुक्ती दिलेल्या शिक्षकांना किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव, लोहा, कंधार, मुखेड, धर्माबाद, उमरी, देगलूर, बिलोली, भोकर तालुक्यांतील शाळांमध्ये असलेल्या रिक्तपदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT