ZP School Admission  Sakal
नांदेड

ZP School Admission : झेडपीच्या शाळेत ३३ हजार विद्यार्थी पहिलीसाठी प्रवेशित

सकाळ वृत्तसेवा

Nanded News : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून गुणवत्तापूर्ण विविध उपक्रम जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्षात राबविण्यात आले आहेत. तसेच इयत्ता ५ वी व ८ वीच्या वर्ग जोडीमुळे विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची सोय झाली आहे.

त्यामुळे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पालकांचा कल वाढल्याचे समर आले आहे. एप्रिलमध्ये शिक्षकांकडून झालेल्या सर्वेक्षणानुसार यंदा ३३ हजार १५९ विद्यार्थी इयत्ता पहिलीसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशित झाले आहेत. मागील वर्षी ३२ हजार ४०० विद्यार्थी प्रवेशित झाले होते.

यंदा यात वाढ झाली असून १५ जूननंतर पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येणार असल्याने विद्यार्थी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यात इतरसोबतच शाळा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचाही समावेश असणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर खासगी शाळांचे पेव फुटले होते अन् त्या शाळांची चलतीही होती. त्याला कारणही तसेच होते. तेथील शैक्षणिक दर्जाच्या तुलनेत सोयीसुविधा अधिक असल्याने मध्यमवर्गीयांपासून ते उच्चवर्गीयांचा कल या आधुनिक शाळांकडे वाढल्याचे दिसून आले.

परिणामी, जिल्हा परिषदेच्या शाळांसह मनपाच्या काही शाळांत विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्याचे चित्र होते. मात्र, आता हे चित्र बदलत आहे. नांदेड जिल्ह्यात २ हजार १९५ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यातील बऱ्याचशा शाळांमध्ये भौतिक सोयीसुविधा, संगणक प्रयोगशाळा, टॅबची सुविधा असणाऱ्या काही आदर्श शाळा आहेत.

तसेच इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग जोडल्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची सोय झाली आहे. यासोबत विविध गुणवत्तापूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक, समाजात वावरण्याचे ज्ञान, शेतीला जोडधंद्याविषयी माहिती दिली जात आहे. त्यामुळे पालकांचा पुन्हा जिल्हा परिषद शाळेकडे पाल्याच्या प्रवेशासाठी कल वाढत असल्याचे चित्र आहे.

तालुकानिहाय प्रवेशित विद्यार्थी

नांदेड १ हजार ३५२, अर्धापूर १ हजार ८४०, मुदखेड १ हजार ४५७, लोहा २ हजार ८२, कंधार ७७८, मुखेड ३ हजार ४९७, देगलूर १ हजार ४७४, नायगाव २ हजार ७३१ असे एकूण १६ हजार ५६१ मुले तर, १६ हजार ५९८ मुली इयत्ता पहिलीत प्रवेशित होणार आहेत, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिकच्या शिक्षण विभागाने सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT