नांदेड : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२७) प्राप्त एक हजार ३९५ अहवालापैकी ४५७ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. दिवसभरात ४९८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गुरुवारी दिवसभरात गंभीर रुग्णांपैकी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या दोन हजार ६६५ रुग्ण संख्या झाली आहे. (Nanded Corona Update)
गुरुवारी महापालिका क्षेत्रात २४०, नांदेड ग्रामीण ४४, धर्माबाद एक, हिमायतनगर एक, लोहा एक, उमरी २२, कंधार चार, मुदखेड तीन, बिलोली तीन, किनवट २२, हदगाव चार, भोकर सात, मुखेड दोन, नायगाव ११, अर्धापूर पाच, देगलूर ४५, हिंगोली नऊ, औरंगाबाद एक, परभणी नऊ, आदिलाबाद तीन, अकोला दोन, लातूर दोन, वाशीम तीन, हरियाणा तीन, हैदराबाद दोन, उत्तर प्रदेश एक, तेलंगणा दोन, बिहार दोन, पुणे दोन, पंजाब एक अशी जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या एक लाख ५०१ झाली आहे. गुरुवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड सेंटरमधील आठ, महापालिकेच्या गृहविलगीकरणातील ३७७, जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरणातील १०५, खासगी रुग्णालयातील आठ असे ४९८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ९३ हजार ६७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयाच्या कोविड सेंटर मध्ये ३६, जिल्हा शासकीय रुग्णालयात तीन, महापालिका गृहविलगीकरण दोन हजार ९०८, तालुक्यांतर्गत गृहविलगीकरणात एक हजार १७६, किनवट कोविड सेंटर दोन व खासगी कोविड सेंटरमधे ३९ अशा चार हजार १६४ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तीन बाधितांची प्रकृती गंभीर आहे.
नांदेड कोरोना मीटर
एकूण बाधित : एक लाख ५०१
एकूण बरे : ९३ हजार ६७२
एकूण मृत्यू : दोन हजार ६६५
गुरुवारी बाधित : ४५७
गुरुवारी बरे : ४९८
गुरुवारी मृत्यू : एक
उपचार सुरु : चार हजार १६४
अतिगंभीर प्रकृती : तीन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.