Loksabha Election 2024 sakal
नांदेड

Loksabha Election Voting : नांदेडला ६५टक्के मतदान ; परभणी, हिंगोली मतदारसंघांमध्ये सरासरी ६३ टक्के

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात अंदाजे ६५, परभणीत ६३ तर हिंगोली मतदारसंघात ६२.६७ टक्के मतदान झाले. तिन्ही जिल्ह्यांत काही केंद्रांवर उशिरापर्यंत ही प्रक्रिया चालली. उन्हामुळे सकाळी व सायंकाळी मतदारांनी केंद्रांवर गर्दी केली. तिन्ही मतदारसंघांत ही प्रक्रिया शांततेत पार पडली.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात अंदाजे ६५, परभणीत ६३ तर हिंगोली मतदारसंघात ६२.६७ टक्के मतदान झाले. तिन्ही जिल्ह्यांत काही केंद्रांवर उशिरापर्यंत ही प्रक्रिया चालली. उन्हामुळे सकाळी व सायंकाळी मतदारांनी केंद्रांवर गर्दी केली. तिन्ही मतदारसंघांत ही प्रक्रिया शांततेत पार पडली. गत निवडणुकीत नांदेडला ६५.६९ टक्के, हिंगोली ६६.८४, परभणीत ६३.१२ टक्के मतदान झाले होते. तुलनेत हिंगोलीत यंदा मतदान कमी झाल्याचे दिसते. कमी झालेल्या मतदानाचा कुणाला लाभ, कुणाला फटका बसतो, हे निकालाअंती कळेलच.

नांदेड मतदारसंघात सरासरी ६५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याचा अंदाज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला. सकाळी नऊनंतर केंद्रांवर मतदारांनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. सकाळी सातला सुरू झालेले मतदान काही केंद्रांवर रात्री नऊपर्यंत सुरूच होते. २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघात ६५.६९ टक्के मतदान झाले होते. तुलनेत यंदा मतदानात वाढ होणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सकाळ-सायंकाळी जोर

परभणी मतदारसंघात अंदाजे ६३ टक्के मतदान झाले. लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभा मतदारसंघांत सरासरी ५० ते ५२ टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. सध्या उन्हाचा कडाका असल्याने सकाळी मोठ्या प्रमाणात लोक मतदानासाठी बाहेर पडले. सकाळी सात ते ११ या पहिल्या चार तासांत २१.७७ टक्के मतदान झाले. सकाळी ११ ते दुपारी एकपर्यंत टक्केवारी ३३.८८ पर्यंत पोचली. उन्हाचा पारा वाढल्यामुळे दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग मंदावला. दुपारी तीनपर्यंत ४४.४९ टक्के तर सायंकाळी पाचला ५३.७९ टक्के आणि सायंकाळी सहापर्यंत मतदानाची टक्केवारी अंदाजे ६३ वर गेली होती.

वेळ संपला तरी मतदान सुरूच

सायंकाळी सहानंतरही शहरी व ग्रामीण भागातील काही केंद्रांवर मतदारांची रांग होती. निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी सहाला केंद्रात आलेल्या मतदारांना आत घेतले अन् गेट बंद केले. या मतदारांना मतदानाची संधी देण्यात आली. झरीसह (ता. परभणी) ग्रामीण भागातील काही केंद्रांवर असे चित्र होते. परभणी शहरातही साखला प्लॉट भाग, खंडोबा बाजार परिसरातील काही केंद्रे सायंकाळीही गजबजलेली होती. याबाबत विचारणा केली असता वेळेच्या आत केंद्रांवर आलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हिंगोली : ६२.६७ टक्के मतदान

हिंगोली मतदारसंघात अंदाजे ६२.६७ टक्के मतदान झल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या वसमत मतदारसंघात ६०, हदगाव ६६, हिंगोली ६०, कळमनुरी ६३, किनवट ६५ आणि उमरखेड मतदारसंघात अंदाजे ६२ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का घसरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT