66 gram panchayat will get new building 15 cr fund sanctioned Sakal
नांदेड

Nanded News : जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींना मिळणार नवीन इमारती; १५ कोटींचा निधी मंजूर

मागील अनेक वर्षापासून इमारती नसलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निधी मिळावा, म्हणून मागणी करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nanded News : मागील अनेक वर्षापासून इमारती नसलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निधी मिळावा, म्हणून मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींना नवीन इमारत बांधण्यासाठी निधी मिळणार आहे.

त्यासाठी राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री बांधणी योजनेतून १४ कोटी ९५ लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या वतीने संबंधित ग्रामपंचायतीच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे.

जिल्ह्याच्या ग्रामिण भागात ग्रामपंचायतींची संख्या एक हजार ३१० आहे. त्यातील २६४ ग्रामपंचायतींना इमारती नाहीत. ग्रामपंचायतीला इमारती उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने मागील अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते.

राज्य शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री बांधणी योजनेच्या माध्यमातून इमारती नसलेल्या जिल्‍ह्यातील ६६ ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी १४ कोटी ९५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय ग्रामपंचायतीने इतर योजनेतून दोन कोटी ५५ लाख रुपये भरण्याच्या सूचनाही करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

या आहेत ६६ ग्रामपंचायती

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी याबाबत एक आदेश काढत कंधार तालुक्यातील बिजेवाडी, गांधीनगर, गुट्टेवाडी, मादाळी, रूई, किनवट तालुक्यातील कोल्हारी, देगलूर तालुक्यातील भायेगाव, रमतापूर,

दरेगाव, टाकळी (ज), गवंडगाव, लोणी, नांदेड तालुक्यातील बोरगाव (त), वांगी, सुगाव बुद्रुक, सायाळ, निळा, रहाटी बुद्रुक, काकांडी, इंजेगाव, बोंढार हवेली, मार्कंड, भोकर तालुक्यातील कामनगाव, धावरी बुद्रुक, माहूर तालुक्यातील पवनाला,

रूई, शेकापूर, सायफळ, मांडवा, सतीगुडा, मच्छिंद्र पार्डी, मुखेड तालुक्यातील उमरदरी, हिरानगर, खैरका, राजुरा बुद्रुक तांडा, चिवळी, कमळेवाडी, फुटकळवाडी, कोटग्याळ, मुदखेड तालुक्यातील डोणगाव, राजवाडी,

लोहा तालुक्यातील बोरगाव, लोंढे सांगवी, देऊळगाव, सायाळ, बोरगाव (आ), कलंबर बुद्रुक, हदगाव तालुक्यातील कोळगाव, उमरी खुर्द, पिंपरखेड, चाभरा तांडा, मनुला बुद्रुक, निमगाव, कोळी, लिंगापूर, हिमायतनगर तालुक्यातील कार्ला पी,

कांडली खुर्द, वडफळी, बळीराम तांडा, अर्धापूर तालुक्यातील दिग्रस नांदली, जांभरूण, पांगरी, खैरगाव बुद्रुक, आमराबाद तांडा, बिलोली तालुक्यातील कौठा अशा ६६ ग्रामपंचायतींना नवीन इमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे.

जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींना ग्रामविकास विभागातर्फे निधी मंजूर झाला असून दोन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना २० लाख रुपये तर दोन हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना २५ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीच्या इमारती बांधण्यासाठी शासनाने तरतूद केली आहे.

या संबंधीचे प्रशासकीय मान्यतेचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार काढण्यात आले आहेत. संबंधित गटविकास अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार ग्रामपंचायतींना निधी देण्यात आला आहे.

- मंजुषा कापसे-जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT