78 thousand eligible for BCG vaccine in nanded Sakal
नांदेड

Nanded News : बीसीजी लसीसाठी ७८ हजार नांदेडकर पात्र; क्षयमुक्तीसाठी महापालिकेचे सर्वेक्षण पूर्ण; लसीकरणास लवकरच सुरवात

nanded latest news in marathi | राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ६० वर्षावरील सर्व प्रौढांचे व १८ वर्षावरील जोखमीच्या गटातील लोकांच्या बीसीजी लसीकरणासाठी महापालिकेच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. यात ७८ हजार लाभार्थी पात्र ठरले असून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. तसेच १३ हजार नागरिक लस घेण्यासाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज्य आरोग्य विभागाकडून सुचना येताच लसीकरण मोहिमेस सुरूवात होणार आहे.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यासाठी क्षयरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्षयरोग प्रतिबंधात्मक औषध देण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रौढांना बीसीजी लस देण्यात येणार आहे.

त्यासाठी यंत्रणेला सर्वेक्षणाच्या सुचना देण्यात आल्या होत्या. महापालिकेने मागील दोन ते तीन महिन्यात १६० आशा सेविका व आरोग्य कर्मचा-यांमार्फत शहरी भागात साडे पाच लाख लोकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यात ७८ हजार लाभार्थी बीसीजी लस घेण्यासाठी पात्र असून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे, असे शहर क्षय अधिकारी मोहम्मद बदयोद्दीन यांनी सांगितले.

मोफत निदान व उपचार

१९७८ पासून देशातील सर्व नवजात बालकांनी बीसीजी लस मोफत दिली जाते, बीसीजी लास क्षयरोगाचे गंभीर प्रकार टाळण्यासाठी व लहान मुलांचे क्षयरोगामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सुरक्षित व प्रभावी लस असल्याचे सिद्ध झाले आहे.

ठराविक कालावधीनंतर क्षयरोगाविरूद्धच्या या लसीमुळे आलेली प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि प्रौढांना क्षयरोगापासून संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे संशोधन करण्यात येत आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत शासन क्षयरूग्णांचे मोफत निदान व उपचार करीत आहे आणि क्षय टाळण्यासाची अनेक धोरणे राबवित आहे.

असे होणार लसीकरण

  • प्रौढ बीसीजी लसीकरणासाठी ६० वर्षावरील सर्व प्रौढ

  • वर्षावरील जोखमीच्या गटातील म्हणजे, मागील पाच वर्षातील सर्व रूग्ण

  • मागील तीन वर्षातील रूग्णाच्या सहवासातील कुटुंबातील नागरिक

  • १८ किलोपेक्षा कमी वजन असलेले

  • धूम्रपान करणारे (स्वघोषित), मधुमेही (स्वघोषित) लाभार्थी पात्र आहेत.

शहरात दीड हजार क्षय रुग्ण

जिल्ह्यातील ग्रामीण भागापेक्षाही शहरात क्षय (टीबी) रूग्णसंख्या अधिक आहे. मागील वर्षी तीन हजार रूग्ण होते. सध्या दिड हजार क्षय रूग्ण उचार घेत आहेत.

मध्यंतरी औषधींचा तुटवडा निर्माण झाला होता. परंतू, आता मुबलक प्रमाणात औंषधी असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाने सांगितले असून लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 नोव्हेंबर 2024

आजचे राशिभविष्य - 22th नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT