80 percent water storage in Vishnupuri project 
नांदेड

विष्णुपुरी प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा

रस्ते झाले जलमय : जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; विष्णुपुरीचा एक दरवाजा उघडला

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस झाल्यानंतर दोन दिवस पावसाने उसंत घेतली होती. मात्र, पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मंगळवारी (ता. १२) शहरातील अनेक सखल भागात पाणी साचून रस्ते जलयम झाले होते. शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. दरम्यान, गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा झाल्याने एक दरवाजा उघडून गोदावरी नदीत विसर्ग करण्यात येत आहे.

शहराजवळ असलेल्या विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प मंगळवारी ८० टक्के क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा दुपारी अडीच वाजता उघडण्यात आला आहे. त्यातून गोदावरी नदीत ३७७ क्युमेक्स विसर्ग सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. दरम्यान, विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे,‍ जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही, यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बळेगाव बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडले

गोदावरी नदीमध्ये पाण्याचा येवा वाढल्यामुळे व शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आल्यामुळे बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याचे दोन दरवाजे मंगळवारी दुपारी उघडण्यात आले. बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या खालील बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या मालमत्तेची, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात सरासरी २२.२० मिलिमीटर पाऊस

नांदेड ः जिल्ह्यात मंगळवारी (ता. १२) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या गत २४ तासात सरासरी २२.२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण ३८८.५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी ता. एक जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची आहे. नांदेड- १८.६० (४०३.४०) बिलोली-१५.६० (३८५.९०), मुखेड- १४.६० (४०१), कंधार-१७.२० (४४५.८०), लोहा-१८.३० (३८४.१०), हदगाव-१९.५० (२९४.९०), भोकर- २३.७० (३५९.८०), देगलूर-१३.६० (३९४.६०), किनवट-४१.७० (४०३.१०), मुदखेड- १८.९० (४८७.१०), हिमायतनगर-२४.७० (४७७.४०), माहूर- ५५.८० (३३८.७०), धर्माबाद-१७.९० (३५६.९०), उमरी- २६.२० (४४१.७०), अर्धापूर- १६.२० (३७४.२०), नायगाव- १८.२० (३१५.५०).

नांदेडात रस्त्यांची दुरवस्था

नांदेड शहरात काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू करण्यात आली आहे. त्यात हा पाऊस सुरू झाल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर नाल्यांची साफसफाई व्यवस्थितरित्या झाली नसल्यामुळे नाल्या तुडुंब भरून रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे याकडे तत्काळ महापालिकेने लक्ष देऊन साफसफाई करण्यासोबतच खड्डे बुजवावेत, अशी मागणी नांदेडकरांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT