अर्धापूर (जि. नांदेड) : साडेतीन शक्तीपीठाची नवरात्र उत्सव निमित्ताने दुचाकीवरून यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती व्हावी व रस्ते सुरक्षाविषयी माहिती देण्यासाठी निघालेल्या सातारच्या (Satara) हिरकणी महिला रायडर्स ग्रुपमधील महिलेचा दुचाकीला नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील भोकर फाटा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या अपघात जागीच मृत्यू झाला आहे. हा (Nanded) अपघात मंगळवारी सकाळी (ता. १२) सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात शुभांगी पवार (रा. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला.
ट्रक चालकास अर्धापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सातारा येथील हिरकमणी महिला रायडर्स ग्रुपच्या वतीने साडेतीन शक्तीपीठाची नवरात्र उत्सव निमित्ताने दुचाकीवरून दर्शन यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर (Ardhapur) व रस्ते सुरक्षा जनजागृती साठी काढण्यात आली होती. या यात्रेला रविवारी (ता.दहा) सुरुवात झाली. ही यात्रा कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका, वणीची सप्तश्रृंगी या साडेतीन शक्तीपिठाची अशी ह़ोणार होती.
ही यात्रा दहा जिल्हे, २५ तालुके, एक हजार ८६८ किलोमीटर प्रवास करुन शूक्रवारी (ता.१५) सातारा येथे सांगता होणार होती. ग्रुप प्रमुख मनिषा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेत शुभांगी पवार, अंजली शिंदे, मोनिका निकम (जगताप), अर्चना कुकडे, केतकी चव्हाण, ज्योती दुबे, श्रावणी बॅनर्जी, भाग्यश्री केळकर यांचा समावेश होता. या यात्रेला सातारा येथील पवई नाका परिसरातील शिवतीर्थपासून छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थित प्रारंभ झाला होता. ही यात्रा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन तुळजापूरची तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन नांदेडमार्गे माहुरला जात होती.
सात दुचाकी नांदेडमार्गे माहुरला जात असताना भोकर फाट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुभांगी संभाजी पवार (वय ४२ रा.सातारा) यांच्या दुचाकीला (एमएच११ सीए १४४७) भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (जीजे १२ एटी ६९५७) धडक दिली. यात शुभांगी पवार यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात शूभांगी पवार यांच्या मृत्यूमुळे या यात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी एकच टाहो फोडला. त्या़चे आश्रु अनावर झाल्याचे दिसले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.