महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनी चिंचोली, कामळज येथील वाळू घाटावर कार्यवाही केली. Sakal
नांदेड

चिंचोली कामळज वाळू घाटावर कारवाई

११ तराफे जाळले; दोन टिप्पर पकडले

सकाळ वृत्तसेवा

मारतळा - लोहा तालुक्यातील चिंचोली, कामळज येथील गोदावरी पात्रातून बिहारी मजुरांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करणारे ११ तराफे पकडून त्याची मोडतोड करत जाळून नष्ट केले. तर अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले, ही धडक कारवाई तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या गौण खनिज प्रतिबंधक पथकाने बुधवारी (ता. १३) सकाळपासून सायंकाळी उशीरापर्यंत चालूच होती.

कापसीचे मंडळ अधिकारी चंद्रशेखर सहारे यांनी याबाबत माहिती दिली. लोहा तालुक्यातील चिंचोली, कामळज हे शेवटच्या टोकावरील गोदावरी नदीच्या काठावरील गावे असून बिहारी मजुर तरफ्याच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करत होते. डॉ. शरद मंडलिक यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार मुंडे यांच्या गौण खनिज प्रतिबंधक पथकाने बोटीच्या सहायाने बुधवारी बोटीतून टेहळणी करत ११ तराफे पकडून एकत्र करत जाळून नष्ट केले. अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर (क्रमांक एम एच १४- एएस ८०७१) आणि (एम एच २६- एडी ३७९०) पकडून दंडात्मक कारवाईसाठी उस्माननगर पोलीस ठाण्यात लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या कारवाईत तहसीलदार मुंडे, नायब तहसीलदार अशोक मोकाले, मंडळ अधिकारी चंद्रशेखर सहारे, डी. एल कटारे, तलाठी मारुती कदम, सतीश शिंदे, मोतीराम पवार, परशुराम जाधव, संदीप कल्याणकर, राजू इंगळे, मनोज जाधव, संतोष अस्कुलकर, एकांडे, भुरेवार, पाईकराव, निकम आदींनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT