registration offices.jpg 
नांदेड

मनपा क्षेत्र वगळून सर्व दुय्यम निबंधक कार्यालय आजपासुन सुरु

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : महानगरपालिका क्षेत्रातील तीन कार्यालय वगळता इतर उर्वरित सर्व दुय्यम निबधंक (श्रेणी-एक) कार्यालयामध्ये दस्तांची नोंदणी शुक्रवारपासून (ता. आठ) पूर्ववत सुरु करण्यात येत असल्याबाबत आदेश सहजिल्हा निबंधक (वर्ग एक) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर यांनी निर्गमीत केला आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी नोंदणी कार्यालय होते बंद  
कोरोना विषाणु (कोवीड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय ता. ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय रविवार ता. १७ मे पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. परंतू स्थावर मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार पुर्ववत सुरु करुन दस्त नोंदणी पुर्ववत सुरु करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी निर्देशीत केले आहे.

महापालिका हद्दीतील तीन कार्यालय बंदच राहणार
सहजिल्हा निबंधक (वर्ग एक) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर यांनी नांदेड महानगरपालिका अंतर्गत असलेले सहदुय्यम निबंधक (वर्ग दोन) कार्यालय नांदेड क्र. एक व दोन तसेच दुय्यम निंधबंक (श्रेणी एक) कार्यालय नांदेड क्र. तीन हे तीन कार्यालय वगळता उर्वरित सर्व दुय्यम निबधंक (श्रेणी-एक) कार्यालयामध्ये कलम १४४ चे पालन करुन शुक्रवारपासून (ता. आठ) दस्तांची नोंदणी पुर्ववत सुरु करण्याकरीता पुढील अटी व शर्तींच्या आधारे परवानगी दिली आहे. 

कंटेनमेंट झोनचा कालावधी संपल्यावर सुरु होणार
सह दुय्यम निबंधक वर्ग -दोन कार्यालय नांदेड क्र. एक व दोन तसेच दुय्यम निंधबंक श्रेणी-एक कार्यालय नांदेड क्र. तीन या तिन कार्यालयाच्या कंटेन्मेंट झोन घोषीत केलेल्या क्षेत्राचा प्रतिबंधीत कालावधी पूर्ण झाल्यानंतर दस्तांची नोंदणी पुर्ववत सुरु करावी. कार्यालये प्रथमतः सुरु करण्याच्या दिवशी व नंतर किमान प्रत्येक सात दिवसानंतर संपुर्ण कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करुन घेण्यात यावे. नागरिकांनी दस्तनोंदणीसाठी जिल्हा मु्ख्यालयाचे ठिकाणाचे कार्यालयासाठी eStep-in व्दारे व इतर ठिकाणी eStep-in किंवा कार्यालयीन दुरध्वनीवर/ समक्ष संपर्क साधुन वेळ आरक्षित करणे अनिवार्य राहील अशा इतर कार्यालयात दुरध्वनीवर/समक्ष टोकन बुकींग साठी प्रथम आलेल्यास प्रथम प्राधान्य (FIFO) या तत्वाचा अवलंब करावा. 


नोंदणीसाठी आरक्षित वेळेलाच कार्यालयात यावे 
दस्तछाननी, सादरीकरण (Stamp I व II) झाल्यावरच इतर पक्षकारांना कबुलीजबाब देण्यासाठी नावाचे क्रमवारीनुसार प्रवेश द्यावा. एका दस्तामध्ये जास्त पक्षकार असल्यास एकावेळी जास्तीत जास्त चारच पक्षकारांना आत प्रवेश दयावा. पक्षकारांनी केवळ फोटो काढण्यापुरता मास्क चेहऱ्यावरुन खाली घ्यावा. प्रत्येक दस्त नोंदणी व्यवहार करताना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर बायोमेट्रीक उपकरणाचे निर्जतुकीकरण (Sanitize) करण्यात यावे. सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक (श्रेणी एक) कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आले आहे, त्याचा वापर करण्यात यावा.

प्रतिबंधात्मक साधनाचा वापर करावा
बायोमेट्रीक डिव्हाईस, दरवाज्याचे हॅण्डल्स, नोब्स, टेबल, खुर्ची इ. चे सातत्याने निर्जतुकीकरण (Sanitization) करत रहावे. सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी-एक कार्यालयातील कर्मचा-यांनी नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करावा तसेच साबणाने हात स्वच्छ धुवावेत. कर्मचाऱ्यानी काम करताना डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळावे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्यासाठी प्रेरित करावे व त्यासाठी नागरिकांना साबण व पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. बायोमेट्रीक उपकरण निर्जतुक (Sanitize) करताना वापरलेला कापसाचा बोळा पेपर कव्हरमध्ये ठेवण्यात यावा आणि तो काळजीपूर्वक व पुरेशी दक्षता घेऊन नष्ट करण्यात यावा. 

सुरक्षीत अंतर राखुन होणार नोंदणी
दस्त नोंदणी कार्यालयातील दोन कक्षांमधील/टेबलांमधील अंतर किमान दोन मिटर राहील याबाबत दक्षता घ्यावी. नागरिकांना त्यांचे नाव व तोंडावर मास्क/स्वच्छ रुमाल बांधणेबाबत सक्ती करावी तसेच रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राहील यादृष्टीने मार्कीग करण्यात यावी तसेच कमीत कमी पक्षकारांनी दस्त नोंदणीस उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी. आवश्यकता असल्यास पोलीसांची मदत घेण्यात यावी. दस्त नोंदणी कार्यालीयाने एक दस्त नोंदणीसाठी आवश्यक तेवढयाच नागरिकांना कार्यालयामध्ये येण्यास परवानगी द्यावी. प्रवेश केलेल्या नागरिकांचे काम झाल्याशिवाय पुढील नागरिकांना कार्यालयामध्ये येण्यास परवानगी देऊ नये. दोन व्यक्तीमध्ये रांगेत पाच फूट अंतर ठेवावे.

नोंदणी महानिरीक्षकांच्या सुचनाचे व्हावे पालन 
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्या परिपत्रकातील सर्व सुचनाचे काटेकोरपणे पालन करावे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हाधिकारी नांदेड यांनी याविषयी जेवढी परिपत्रके, आदेश, सूचना, काढले असतील त्या सर्व परिपत्रके, आदेश, सूचना यांचे योग्यरित्या पालन करावे. यात कोणतीही हयगय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. 

आदेशाचे उल्लघन करणाऱ्याविरुध्द होणार कारवाइ
या आदेशाचे उल्लघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, अधिसुचना क्र.कोरोना २०२०/ प्र.क्र./५८/आरोग्य-पाच दिनांक १४ मार्च २०२० मधील तरतुदीनुसार ‘महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२०’ चे नियम अकरानुसार, भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात सहजिल्हा निबंधक (वर्ग एक) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर यांनी नमूद केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : खडकवासला जवळील डोणजे गावचे माजी उपसरपंचाची हत्या

SCROLL FOR NEXT