ardhapur political leaders gave resign for maratha reservation marathi news sakal
नांदेड

Maratha Reservation : अर्धापूर तालुक्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी दिले राजीनामे

आधी आरक्षण मगच पक्ष...आसा निर्धार

लक्ष्मीकांत मुळे

नांदेड : तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. आधी आरक्षण मगच पक्ष अशी भुमिका घेत जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पदावर राहणार नाही आसा निर्धार केला आहे. ज्या पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामे दिले आहेत ते पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दुसऱ्या टप्प्यांतील उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला जिल्ह्यातील सर्वंच तालुक्यात खूप मोठा प्रतिसाद मिळत असून गावागावांतून विविध मार्गांनी आंदोलन करण्यात येत आहे.तर राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पदाचे राजीनामे देत आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पप्पु पाटील कोंढेकर, भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उद्धवराव ‌‌‌‌‌‌राजेगोरे, यूवक कांग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पवन पाटील इंगोले यांनी आपल्या पदांचे राजीनामे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनकडे दिले आहेत. या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT